22.6 C
New York
Thursday, July 18, 2024
spot_img

Life at 25 pune cafe will serve you bhang ka sandwich hemp coffee perfectly legally know their owner story mhod


नीलम कराळे-नलावडे, पुणे ,  31 ऑगस्ट : भांगेचे सँडविच किंवा मारिजुआना बर्गर या सारखे पदार्थ आपल्या देशात कायदेशीरपणे खाता येतात हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुण्यातील मध्यवस्तीमध्ये याबाबतचे कॅफे आहे, हे समजल्यानंतर तर तुम्हाला धक्काच बसेल. पण, होय हे खरे आहे. पुण्यातील अमृता शितोळे या तरूणीने चक्क भांगेपासून सँडविच आणि बर्गर तयार करणारा हेम्प कॅफे (The Hemp Cafe in pune) सुरू केला आहे. अमृता आयुष्यातील एका टप्प्यात निराश झाल्याी होत्या. डिप्रेशनमध्ये असतानाच त्यांना हा साक्षात्कार झाला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचं ध्येय बदललं. भांगेबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काम करणाऱ्या अमृता शितोळे यांच्याबद्दल आपण Life @25 या विशेष मालिकेत जाणून घेणार आहोत.

कसा आहे कॅफे?

तुमच्या शहरातून (पुणे)

पुण्यातील पर्वती पायथा भागातील हेम्प कॅफेमध्ये गेलात की या कॅफेचं वेगळेपण जाणवू लागते. या कॅफेत चक्क भांगेपासून कॅफे आणि बर्गर हे पदार्थ मिळतात. ‘भांग म्हणजे नशा, भांग म्हणजे काही तरी वाईट’ असा आपल्या मनात असलेला समज दूर करण्याचा प्रयत्न अमृता शितोळे आणि अमृता खैरे या तरूणी करत आहेत.

अमृता शितोळे यांनी या कॅफेच्या संकल्पनेबद्दल सांगितलं की, ‘भांगेच्या झाडांच्या पानांपासून औषधं किंवा मादक पदार्थ तयार केले जातात. मात्र, आमच्या कॅफेमधे जे काही पदार्थ बनतात ते भांगेच्या बियापासून बनवलेले असतात. भांगेच्या बिया या नशेच्या नसतात तर त्या न्यूट्रिशन आणि प्रोटीन युक्त असतात.

या बियांपासून नशा होत नाही. मात्र, आपल्या शरीराला आवश्यक असे ओमेगा आणि अनेक प्रकारचे उपयुक्त न्यूट्रिशन आ प्रोटिन्स बियांपासून मिळतात. जेवढे फायदे माशांच्या तेलाचे आहेत, त्याहून अधिक फायदे या भांगेच्या बियांचे आहेत. यामुळे या कॅफेमध्ये खाल्लेले बर्गर आणि सँडविचदेखील तुम्हाच्या शरीरासाठी प्रोटिन्स देणारे ठरतात.’

जिवलगांचा अखेरचा प्रवास होणार सुकर, ‘मोक्षप्राप्ती’ करणार ऑनलाईन मदत, Video

डिप्रेशनमध्ये सुचली कल्पना!

सध्या वयाच्या तिशीमध्ये असलेल्या अमृता गेल्या चार वर्षांपासून हा कॅफे चालवत आहे. भांग ही औषधी वनस्पती असून आयूष मंत्रालयानंही ते मान्य केलं आहे. आयुर्वेदामध्येही त्याचा उल्लेख असल्याचं त्या सांगतात. फक्त पुण्यातील नाही तर देशातील अनोखा कॅफे चालवणाऱ्या अमृता यांना ही कल्पना त्या डिप्रेशनमध्ये असताना सुचली होती.

काही वर्षांपूर्वी अमृता डिप्रेशनमध्ये होत्या. त्यामधून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्याच काळामध्ये उत्तराखंडच्या सहलीमध्ये त्यांना भांग या वनस्पतीचा औषधी उपयोग कळाला. तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता.

या अनोख्या कॅफेमध्ये फक्त तुम्हाला फक्त पदार्थच मिळणार नाहीत, तर भांगेबद्दलचे समाजात जे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर करण्यासाठी अमृताने म्युझियमदेखील तयार केले. . या म्युझियमच्या माध्यमातून त्या भांगेबद्दलचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रिय व्यक्तीचं दारुचं व्यसन सोडवायचंय? ह्या भाजीचा आहारात समावेश करा अन् जादू पाहा

प्रत्येकाच्या आयुष्यात यश-अपयश, अपयशामधून डिप्रेशन या गोष्टी कधी-ना कधी काही काळासाठी तरी येतात. त्या डिप्रेशनमध्ये मार्ग काढून नवे ध्येय निश्चित करण्याचं, ते ध्येय गाठण्यासाठी आयुष्य झोकून देण्याचं काम फार कमी जणं करतात. अमृता शितोळे या कमी लोकांपैकी एक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News