22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Skin care homemade tamarind face bleach for spotless skin marathi rp


मुंबई, 01 सप्टेंबर : त्वचेला (Skin) डागरहित ठेवणे हा सौंदर्य टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. मात्र, वयानुसार त्वचेवर तपकिरी डाग आणि काळपट व्रण दिसू लागतात. असं सूर्यप्रकाश, प्रदूषण, हार्मोनल बदल, वाढतं वय इत्यादीमुळे होऊ शकतं. यावर अनेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या फेस ब्लीचच्या (Face Bleach) मदतीनं त्वचा उजळ करण्याचा प्रयत्न करतात. त्वचेला तजेलदार बनवण्याच्या या उपायांमुळे त्वचेला साईड इफेक्टही होऊ शकतात. केमिकल ब्लीचऐवजी नैसर्गिक ब्लीचची मदत घेतली तर जास्त फायदा होतो. चिंचेच्या (Tamarind) मदतीने आपण त्वचा डागरहित आणि चमकदार बनवू शकता. खरंच, ऐकायला थोडं विचित्र वाटलं असेल पण चिंचेमध्ये ब्लीचिंग घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी खूप उपयुक्त (Homemade Tamarind Bleach For Spotless Skin) आहेत.

त्वचेसाठी चिंचेचे फायदे

AHA म्हणजेच अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड चिंचेमध्ये आढळते, ते निरोगी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. चिंचेचा कोळ त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते. याशिवाय चिंचेमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला यूव्ही किरणांपासून वाचवण्यास मदत करतात आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.

Tamarind Bleach Cream साठी लागणारं साहित्य

– 2 टीस्पून दही

– 1 टीस्पून चिंचेचा कोळ

– टीस्पून कॉर्नफ्लोर

चिंचेचा ब्लीच कसा बनवायचा

चिंचेपासून ब्लीच क्रीम बनवण्यासाठी प्रथम सुती कपड्यात दही ठेवा आणि त्यातील पाणी चांगले पिळून घ्या. आता त्यात चिंचेचा कोळ आणि कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करा.

हे वाचा – साखरेचा चेहऱ्यासाठी असा कधी वापर केला नसेल; Skin care products फिके पडतील

चिंचेच्या ब्लीच पावडरसाठी साहित्य

– 2 व्हिटॅमिन सी गोळ्या

– टीस्पून बेकिंग सोडा

– अर्धा चमचा कस्तुरी हळद

चिंचेची ब्लीच पावडर कशी बनवायची

या सर्व गोष्टी एका भांड्यात टाका आणि नीट मिक्स करा.

असे वापरा

चिंचेची ब्लीच क्रीम आणि चिंचेची ब्लीच पावडर एका भांड्यात मिसळा. आता हाताने किंवा ब्रशच्या मदतीने चेहरा, मान आणि इतर ठिकाणी लावा. 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. नंतर थंड पाण्याने त्वचा पूर्णपणे धुवा. असं दर आठवड्याला केलात तर चांगला परिणाम दिसेल.

हे वाचा – नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी राहु रेषा! प्रचंड धन-दौलत-नाव कमावतात ही माणसं

ब्लीचचे फायदे

यामध्ये वापरल्या जाणार्‍या दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळते. त्वचेवरील डाग कमी करण्यासोबतच त्वचेला त्यातून भरपूर प्रथिनांचा पुरवठा होतो, ज्यामुळे त्वचेची चमकही वाढते.

कॉर्नफ्लोरमध्ये भरपूर ब्लिचिंग एजंट गुणधर्म असतात, ते डाग काढून टाकण्यास मदत करतात.

कस्तुरी हळद नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते आणि त्वचा चमकदार बनवते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News