27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

symptoms of Bone Cancer know the 10 risk factors mhgm gh


मुंबई, 01 सप्टेंबर :   कॅन्सर अर्थात कर्करोग हा जीवघेणा आजार समजला जातो. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. कॅन्सर कोणताही असला तरी त्याचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर संबंधित रुग्णाला निश्चित दिलासा मिळू शकतो. त्यामुळे कॅन्सरची लक्षणं दिसताच त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं तपासणी करणं गरजेचं आहे. हाडाचा कॅन्सर  हा कर्करोगाचा एक सर्वसामान्य प्रकार आहे. या कॅन्सरमध्ये हाडातील असामान्य पेशी अनियंत्रित वाढतात. हाडाच्या कॅन्सरचा प्रामुख्याने ओटीपोट किंवा हातापायाच्या लांब हाडांवर विपरित परिणाम होतो. या कॅन्सरची काही पूर्वलक्षणं शरीरात दिसू लागताच त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. या लक्षणांमध्ये वेदना, सूज, वजन कमी होणं आदींचा समावेश आहे. इंडिया डॉट कॉमने या विषयीची माहिती दिली आहे.

हाडाचा कॅन्सर हा गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. हाडातल्या असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने हा कॅन्सर होतो. बहुसंख्य रुग्णांना अन्य कोणत्याही प्रकारचा कॅन्सर झाला असेल तर त्याचा हाडांमध्ये प्रसार होऊन बोन कॅन्सर होतो. त्यामुळे हाडांच्या कॅन्सरच्या अनुषंगाने ही बाबही विचारात घ्यावी लागते. हाडाचा कॅन्सर असेल तर त्याची काही लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात दिसू लागतात. सांधे कडक होणं हे हाडाच्या कॅन्सरचं एक लक्षण आहे. जर तुम्हाला सांधेदुखीमुळे रोजची कामं करणं कठीण होत असेल तर हे हाडांच्या कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. हाडांवर लम्प अर्थात गाठ दिसत असेल तर ते कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक लक्षण होय.

हेही वाचा – Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

सतत वेदना आणि सूज चिंताजनक असू शकते. सततच्या वेदनांमुळे झोप न येणं, मनःशांती न मिळणं हे हाडांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अचानक वजन कमी होणं हे एखाद्या शारीरिक समस्येचं सूचक असतं. सतत थकवा जाणवणं, रोजची कामं सहजतेनं न करता येणं अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही संपूर्ण आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. कारण थकवा हे हाडांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. रात्रीच्या वेळी खूप घाम येत असेल तर तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण हाडांच्या कॅन्सरमुळं असा त्रास जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर तुम्ही काही कारणांमुळे लंगडत चालत असाल तर हे देखील हाडांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला हालचाली करताना त्रास होत असेल, चालणं, बसणं अशक्य वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. या लक्षणांसह सातत्यानं ताप येत असेल तर तातडीनं सावध होत वैद्यकीय तपासणी करून घ्या. हाडे कमकुवत झाली असतील आणि सहजपणे अस्थिभंग अर्थात फ्रॅक्चर होत असेल तर ही बाब हाडांचा कॅन्सर असल्याचं सूचित करते, अशी माहिती चेंबूर येथील एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटल आणि कॅन्सर वन क्लिनिकचे ओन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ओन्कोलॉजिस्ट डॉ. सुहास आग्रे यांनी दिली.

हाडांच्या कॅन्सरची ही काही पूर्व लक्षणं आहेत. यापैकी कोणतेही लक्षण दीर्घकाळ आणि सातत्यानं जाणवत असेल तर तातडीने निदान, तपासणी आणि उपचार सुरू करावेत. कारण कॅन्सरचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर रुग्णासाठी ते दिलासादायक ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News