27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Triceps extension keeps diabetes under control this exercise is also beneficial mhpj


मुंबई, 1 सप्टेंबर : मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराला हळूहळू कमकुवत करतो. भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषत: पावसाळ्यात मधुमेहाचा त्रास अधिक होतो. पावसामुळे चालणे, व्यायाम यांसारखी कामे आणि बाहेर पडणे कमी होते. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ सकस आहारच नाही तर व्यायामही महत्त्वाची भूमिका बजावतो.

ट्रायसेप्स एक्स्टेंशन व्यायामाचा साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदा होतो. ही एक वेट एक्सरसाइज आहे, जी शरीराच्या वरच्या भागाचे वजन कमी करण्यास मदत करतो. ट्रायसेप्स एक्स्टेंशन व्यतिरिक्त मधुमेह नियंत्रित करण्यात फायदेशीर ठरणारे इतर कोणते सोपे व्यायाम आहेत ते जाणून घेऊया.

स्‍टँडिंग बायसेप्स कर्ल

वेब एमडीनुसार, निरोगी आहाराव्यतिरिक्त मधुमेह नियंत्रित करण्यासाठी व्यायाम देखील महत्त्वपूर्ण असतो. साखरेची पातळी कमी करण्यासाठी उजन उचलण्याचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. ट्रायसेप्स एक्स्टेंशनसोबत स्टँडिंग बायसेप्स कर्ल केले तर शरीराची ताकद वाढवता येते.

Brain And Heart : हृदय कमकुवत असणाऱ्यांचा मेंदू लवकर होतो वृद्ध! असं आहे हार्ट आणि ब्रेनचं कनेक्शन

यासाठी एका हातात वजन म्हणजेच डंबेल धरा आणि दुसरा हात पायावर ठेवून सरळ उभे राहा. डंबेल उचलताना बायसेप्स आतील बाजूने खेचा. नंतर हात कोपरापासून वाकवून खांद्याच्या दिशेने हलवा. हा व्यायाम एका हाताने 15 ते 20 वेळा करा आणि नंतर त्याच प्रकारे दुसऱ्या हाताने करा.

हसणं शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर; काय सांगतात संशोधक?

प्लँक एक्सरसाइज

प्लँक एक्सरसाइजचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. शरीराच्या मुख्य स्नायूंना टोन करण्यास या व्यायामाची मदत होते. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखू शकते. ही एक्सरसाइज करण्यासाठी पोटावर झोपा आणि तळहात आणि पंजाच्या मदतीने शरीर वर उचला. असे करताना त्रास होत असेल तर तळहातांच्या ऐवजी कोपरांवर शरीर उभे करण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना पोट, ग्लूट्स आणि पाठीचे स्नायू टाइट ठेवा. 15 ते 20 सेकंद या स्थितीत रहा आणि पुन्हा नंतर जमिनीवर झोपा. हा व्यायाम 4 ते 5 वेळा केला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News