22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

93 year old woman died after drinking juice actually drink washing liquid in america mhpl


वॉशिंग्टन, 31 ऑगस्ट : ज्युस पिणं आरोग्यासाठी चांगलं. बरेच लोक असे आहेत जे नियमित ज्युस पितात. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एका महिलेचा ज्युस प्यायल्याने मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 93 वर्षांची महिला ज्युस प्यायली आणि त्यानंतर तिची प्रकृती इतकी खालावली की तिचा जीवच गेला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण आहे कॅलिफोर्नियातील. 93 वर्षांची गर्टुड एलिझाबेथ मुरिसन मॅक्सवेल. अटरिया पार्क सीनियर लिव्हिंग फॅसिलिटीमध्ये राहत होती.  तिला डिमेन्शिया होता.  रिपोर्टनुसार एलिझाबेथची मुलगी मर्सिया कुसिनने सांगितलं की, तिची आई स्वतःहून काहीच खाऊ-पिऊ शकत नव्हकी. केअरटेकर तिला हातांनी भरवायचे.

अशाच केअर होममधील एका कर्मचाऱ्याने त्यादिवशी तिला द्राक्ष्यांचा ज्युस दिला. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिचं तोंड, घसा आणि तोंडातील घास पोटातील जठरापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रासनलिकेत चट्टे पडले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

हे वाचा – अजब! जमिनीवर पाय ठेवताच महिलेला येते चक्कर; कारणही आहे विचित्र

खरंतर तिला ज्युस म्हणून जे पाजण्यात आलं ते ज्युस नव्हतं, तर वॉशिंग लिक्विड होतं. ज्युस म्हणून ती वॉशिंग लिक्विड प्यायली आणि ज्यामुळे तिचा जीव गेला.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. स्थानिक अधिकारी याचा तपास करत आहेत. तर आपण तपासात मदत करत आहोत, असं  सीनिअर लिव्हिंग फॅसिलिटीने म्हटलं आहे. NBC च्या रिपोर्टनुसार चुकून द्राक्षाचा ज्युस समजून सफाईचं लिक्विड पाजलं असावं.  या प्रकरणात केअर होममधील संबंधिक कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहितीही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News