22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Environment friendly Ganeshotsav how to find ganpati idol is of clay or plaster of paris


मुंबई, 30 ऑगस्ट : अनेक गणेश भक्त पर्यावरणीय दृष्टीकोन आणि मूर्ती विसर्जित (Ganpati Idol Clay) करताना कुठलेही विघ्न येऊ नये, म्हणून मातीच्या मूर्तीच्या शोधात असतात. मात्र, मूर्ती ओळखणे कठीण जात असल्याने मातीची मूर्ती असल्याचे सांगून विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आपण घरी आणत असलेली गणपतीची मूर्ती खरंच मातीची आणि पर्यावरणपूरक आहे का? असा संभ्रम अनेक भक्तांना असतो.

पर्यावरणपूरक गणपती मूर्ती म्हणून मातीच्या गणपतीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ओळखली जाते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तीवर बंदी आणून देखील या प्रकारातील मूर्ती हद्दपार होताना दिसत नाही. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे.

मातीची मूर्ती शोधताना या काही टिप्स

प्रत्येक मूर्तीमध्ये विविधता

मातीची मूर्ती बनविताना पूर्णपणे साचा वापरला जात नाही. त्यामुळे, धडापासून मूर्तीचे सर्व अवयव दूरदूर दिसतात. मूर्तीवर असलेला उंदीरही चिकटलेला दिसत नाही. पीओपी मूर्ती साचा वापरून तयार करण्यात येत असल्याने उंदीर मूर्तीला पूर्णपणे चिकटलेला दिसेल

लाकडी पाटाचा वापर

मातीची मूर्ती हाताने बनवण्यात येत असल्याने ती बनवताना शक्यतो लाकडी पाटाचा वापर केला जातो.

मूर्तीचे वजन

पीओपी मूर्ती हलकी आणि मातीची वजनदार असते. हे लपवण्यासाठी मूर्तीच्या तळात वजनदार वस्तू भरल्या जातात. अशा वेळी थोडे कोरल्यास आतील अवजड वस्तू नजरेस पडतील. पूर्ण मातीच दिसल्यास ती मूर्ती शुद्ध मातीची असेल.

मूर्तीची चमक

पीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून पाहा.

मूर्तीच्या मागे छिद्र

पीओपी मूर्तीच्या तुलनेत मातीची मूर्ती तयार केल्यानंतर वाळायला वेळ लागतो. तयार केलेली मूर्ती आतमधून योग्य पद्धतीने सुकावी, भेगा पडू नये म्हणून मूर्तीला मागे एक छिद्र ठेवण्यात येते. तर, पीओपी मूर्तीला असे छिद्र पाहायला मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News