22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Reasons behind heart attack in young people you dont make these mistakes heart care health tips mhpj


मुंबई, 31 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. यापैकी बहुतेक जण 40-50 वर्षांच्या आसपास आहेत. तज्ज्ञांच्या मते, आता सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. जीवनशैली बदलून आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवल्यासच हा धोका टाळता येऊ शकतो. अनेकांना हृदयविकाराच्या मोठ्या धोक्यांची जाणीवही नसते. अपोलो हॉस्पिटल्स नवी दिल्ली येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा यांच्याकडून हृदयविकाराच्या सर्वात सामान्य कारणांबद्दल जाणून घेऊया. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत हेदेखील तुम्हाला कळेल.

जाणून घ्या हार्ट अटॅकची 7 प्रमुख कारणे

डायबिटीज : हृदयविकाराच्या सर्वात मोठ्या कारणांमध्ये डायबिटीज पहिल्या क्रमांकावर आहे. डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास ते हृदयविकाराचे कारण बनते. त्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवले पाहिजे.

हाय कोलेस्ट्रॉलमध्ये बटाटे खाऊ शकतो का? जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे

तणाव आणि नैराश्य : बहुतेक लोक तणावाच्या समस्येशी झुंजत असतात. तणावाचा अतिरेक झाला की त्याचे रूपांतर नैराश्यात होते. नैराश्य आणि तणावामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

उच्च रक्तदाब : रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. रक्तदाब नियंत्रणात नसेल तर ते हृदयविकाराचे कारण बनते.

धूम्रपान : आजच्या युगात सिगारेट ओढणे ही एक फॅशन बनली आहे. परंतु त्याच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो. सिगारेटमुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे धूम्रपान करणे पूर्णपणे बंद करावे.

कौटुंबिक इतिहास : काही लोकांच्या कुटुंबात इतर व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आलेला असतो. यामुळे अनुवांशिकरीत्या तरुणही हृदयविकाराचे बळी ठरू शकतात. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा कौटुंबिक इतिहास असेल, तर नक्कीच एखाद्या तज्ञाशी संपर्क साधा.

उच्च कोलेस्टेरॉल : कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि हृदयाकडे जाणारे रक्त थांबते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कोलेस्ट्रॉल नेहमी नियंत्रणात असावे.

शरीरातलं युरिक अ‍ॅसिड होईल कमी, ‘या’ तीन भाज्यांचा करा जेवनात समावेश

लठ्ठपणा : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लठ्ठपणा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवावे.

हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा

डॉ.वनिता अरोरा यांच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयविकार टाळायचे असतील तर तुम्हाला तुमचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवावे लागेल. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. रोज व्यायाम करावा लागेल आणि धूम्रपानापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. कमी तेलात घरी शिजवलेले अन्न खावे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल आणि कार्बोहायड्रेट्स कमी करता येतील. निरोगी लोकांनी देखील नियमित तपासणी केली पाहिजे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत आणि काही समस्या असल्यास विलंब न करता हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News