23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Gauri ganpati 2022 follow these tips to make gauri ganpati faral quick ans easy way mhpj


मुंबई, 29 ऑगस्ट : गौरी गणपतीची तयारी आपल्याला अगोदरच सुरु करावी लागते. घराची साफसफाई, मखरांची तयारी, सजावटीसाठी लागणारे साहित्य, गौरींच्या दागिन्यांची तयारी. या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण वळतो फराळाच्या पदार्थांकडे. मात्र तेव्हा आपल्या हातात खूप कमी वेळ उरलेला असतो आणि सर्व फराळ बनवताना आपली खूप ओढाताण होते. मात्र आज आम्ही तुमच्या साठी काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यांचे पालन केल्यास फराळ बनवताना तुमची पळापळ होणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल.

फराळाच्या पदार्थांसाठी अशी करा पूर्व तयारी

तांदळाचे पीठ तयार करून ठेवणे

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक करावे लागतात. गौरी गणपतीची पूर्वतयारी करताना जर तुम्ही तांदळाचे पीठ तयार करून ठेवले. तर नंतर तुमचा खूप वेळ वाचतो. कोणतेही स्वच्छ धुवून फॅनच्या हवेत चांगले वाळवून घ्या आणि सुकल्यानंतर गिरणीमधून बारीक पीठ दळून आणा.

Ganesh Chaturthi 2022: म्हणून शुभ प्रसंगी स्वस्तिक चिन्ह काढतात, गणपतीशी त्याचा आहे असा संबंध

वेलची पूड तयार करून ठेवा

गौरी गणपतीचा फराळ बनवताना अनेक गोड पदार्थांमध्ये आणि पुराणपोळीमध्ये आपल्याला वेलची पूड लागते. त्यासाठी काही वेलची घेऊन त्या हलक्या गरम करा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तुम्ही त्यात साखरही घालू शकता.

खोबऱ्याचा किस तयार करून ठेवणे

फराळाच्या पदार्थांमध्ये करंजी, मोदक, साटोऱ्या असे पदार्थ बनवताना आपल्याला खोबऱ्याचा किस जास्त प्रमाणात लागतो. खोबऱ्याचा किस करत बसण्यात खूप वेळ जातो त्यामुळे खोबऱ्याचा किस तयार करून ठेवा. यासाठी खोबरं 10-15 ठेवा. यामुळे खोबरं किसायला सोपं होतं. पाण्यातून काढून खोबरं स्वच्छ कपड्याने छान पुसून घ्या आणि मग किसा. खोबरं बराच काळ टिकवून ठेवायचं असेल तर ते कढईत थोडा वेळ गरम करून घ्या. नंतर थंड करून डब्यामध्ये भरून ठेवा.

सुक्या मेव्याचे काप

फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे कापही लागतात. यासाठी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून दाभ्यात भरून ठेवा. वेळेवर वेळ वाचतो.

रवा भाजून ठेवा

लाडूंसाठी किंवा कारंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो. त्यामुळे आपल्याला ज्या प्रकारचा रवा लागतो, जसे की जाडा किंवा बारीक. तो तूप घालता आधीच भाजून ठेवावा. रवा पूर्ण थंड झाल्यावर तो डब्यात भरून ठेवा.

डेसिकेटेड कोकोनट

इन्स्टंट मोदक किंवा असेच इन्स्टंट पदार्थ बनवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागते. ते बाजारातून न आणता तुम्ही घरीही बनवून ठेऊ शकता. यासाठी ओले नारळ घ्या आणि ते करवंटीसह एका स्टीमर मध्ये घालून 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर ते बाहेर काढून थंड करून करून घ्या. थंड झाल्यानंतर हे नारळ करवंटीमधून बाहेर काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडे बारीक करून घ्या. याला सलग फिरवू नका. ५-५ सेकंड फिरवा आणि बंद करा. त्यानंतर जाड तळाच्या कढईत कमी गॅसवर भाजून घ्या आणि हे व्यवस्थित कोरडे होऊ द्या. नंहतर थंड झाल्यावर डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

Kalash Sthapana: पूजेच्या कलशामध्ये नारळाला यासाठी असतं महत्त्व; मंगल कार्ये होतात निर्विघ्न सुरू

यासर्वांबरोबरच तुम्ही खसखस देखील भाजून ठेऊ शकता. तसेच पिठी साखरही तयार करून ठेवा आणि गुलदेखील बारीक करून ठेऊ शकता. या सर्व टिप्समुळे सणाच्या काळात तुमचा खूप वेळ वाचेल आणि तुम्ही सर्व सण आनंदाने जगू शकाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News