25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Recite Ganesha Atharvashirsha every day in Ganeshotsav by following these rules mhpj


मुंबई 30 ऑगस्ट : दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर 10 दिवस अतिशय उत्साह, आनंद आणि जल्लोषात गणेशोत्सव सजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे गणपतीच्या स्थापनेसाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.गणपतीची पूजा किंवा स्थापना करताना काही श्लोक, स्तोत्र आणि आरत्या म्हटल्या जातात. गणपती अथर्वशीर्ष हे यापैकी अत्यंत महत्त्वाचे असते. गणेशभक्त प्रत्येक चतुर्थीला आणि श्री गणेशाच्या पूजा विधीला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करतात. यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतात असे मानले जाते.

अथर्वशीर्ष काय आहे?

अथर्वशीर्ष हे अथर्व वेदाशी संबंधित आहे. अथर्वचा अर्थ ‘स्थिर’ होतो तर मस्तकाला शीर्ष असे म्हटले जाते. अथर्वशीर्षचा अर्थ स्थिरबुद्धी असा होतो. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने बुद्धी स्थिर होते असे मानले जाते. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे आणि त्याची रचना गणक ऋषी यांनी केली आहे. हे अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम पाळणे आवश्यक असते. जाणून घेऊया काय आहेत ते नियम?

Gauri Ganpati Muhurt 2022 : गणपती प्रतिष्ठापना, ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, ‘हे’ आहेत अचूक शुभ मुहूर्त

अथर्वशीर्ष पठण करण्याचे नियम

– ‘सकाळ’च्या वृत्तानुासार, अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी.पूजा करणे शक्य नसेल तरत गणपतीचे मनोभावे ध्यान करावे आणि नमस्कार करावा.

– अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे, वडिलधार्‍यांना आणि गुरुंना नमस्कार करावा. तसेच पठण करताना मांडी पालटणार नाही याची काळजी घ्यावी.

– अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसू नये. याऐवजी अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

– अथर्वशीर्ष पठण करताना शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट असावे आणि भावपूर्वक एका लयीत म्हणावे. तसेच त्याचा अर्थही समजून घ्यावा.

Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

– तुम्ही एकाहून अधिक वेळा अथर्वशीर्ष पठण करणार असाल तर ते ‘वरदमूर्तये नमः।’ इथपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती आहे, ती सर्वात शेवटी म्हणावी.

– त्याचप्रमाणे अथर्वशीर्षाच्या आधी दिलेला शांतीमंत्र देखील सुरुवातीला एकदाच म्हणावा, तो प्रत्येक पठणापूर्वी म्हणू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News