3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

This woman hasn’t cut her hair in 40 years; 110 feet long hair earned a place in the Guinness Book of Records mhsz gh


नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: अनोखं टॅलेंट किंवा प्रतिभा असणाऱ्या लोकांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness book of world records) नोंदवलं जातं. आपल्याला कल्पनाही नसते, अशी वर्ल्ड रेकॉर्ड लोकांच्या नावे असतात. अलीकडेच एका महिलेचं नाव तिच्या लांब केसांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला गेल्या 40 वर्षांपासून आपले केस वाढवत आहे. गेल्या 40 वर्षांपासून एकदाही तिने केस कापलेले नाहीत. ही महिला कोण आहे? 40 वर्षांमध्ये या महिलेचे केस किती वाढले, तिच्या केसांचे वजन किती आहे? ती तिच्या केसांची काळजी कशी घेते? याबद्दल आज तकने वृत्त दिलंय. जाणून घेऊ या सविस्तर.

40 वर्षांपासून केस वाढवणारी महिला कोण?

40 वर्षांपासून केस वाढवणाऱ्या महिलेचं नाव आशा मंडेला (Asha Mandela) असून ती फ्लोरिडातील क्लेरेमॉन्ट येथे राहते. तिचं वय 60 वर्षे आहे. आशा मंडेला यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, “मी माझ्या केसांना माझा शाही मुकुट मानते.” गिनीज वेबसाइटनुसार, 2009 मध्येही सर्वांत लांब ड्रेडलॉक केसांचा विक्रमही तिच्या नावावर होता. ड्रेडलॉकला लॉक्स किंवा ड्रेड्स असेही म्हणतात. साधू आणि अनेक लोकांचे केस दोरीसारखे दिसतात, त्यांना ड्रेडलॉक्स (Dreadlocks) म्हणतात. ते एका खास पद्धतीने बनवले जातात.

13 वर्षांपूर्वी किती होती केसांची लांबी

रेकॉर्ड साईटवरील माहितीनुसार, आशा यांनी 40 वर्षांपूर्वी त्रिनिदाद आणि टोबॅगो बेटावरून अमेरिकेतील न्यूयॉर्कला गेल्यानंतर त्यांनी केस वाढवण्यास सुरुवात केली. 11 नोव्हेंबर 2009 रोजी आशा मंडेला यांच्या केसांची लांबी 5.96 मीटर म्हणजेच 19 फूट 6.5 इंच होती आणि आज त्यांच्या केसांची लांबी 33.5 मीटर म्हणजेच 110 फूट आहे.

केसांचं वजन किती?

आशा मंडेला यांच्या 110 फूट केसांचं वजन 19 किलो आहे. आशा त्यांचे केस कापडात बांधून कमरेला लटकवतात, यामुळे त्यांच्या मानेवर ताण पडत नाही. आशाच्या पतीचं नाव इमॅन्युअल चेगे असून, तो केनियाचा प्रोफेशनल लॉक स्टायलिस्ट आहे. तो केसांमध्ये ड्रेडलॉक तयार करतो. आशाच्या केसांचे ड्रेडलॉक तोच बनवतो.

केस धुण्यासाठी किती शॅम्पू लागतो?

आशा दर आठवड्याला त्यांचे केस धुतात. त्यांना एकावेळी केस धुण्यासाठी 6 शॅम्पूच्या बाटल्या लागतात. शिवाय धुतल्यानंतर ते केस वाळवायला पूर्ण दोन दिवस लागतात. दरम्यान, आशा यांचे केस त्यांची ओळख झाले आहेत. या 33 मीटर लांब केसांची काळजी घेताना त्यांची दमछाक किती होत असेल हे त्यांनाच माहिती, पण त्यांच्या केसांनी तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून दिलंय, हे मात्र नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News