22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Breast implant surgery side effects woman cause health issues fatigue joint pain headaches mhpl


वॉशिंग्टन, 27 ऑगस्ट : हल्ली प्रत्येक शारीरिक समस्यांवर उपाय आहेत. अगदी शरीराच्या काही अवयवांचा आकारही लहान-मोठा किंवा आपल्याला हवा तसा करून घेता येतो. अगदी ब्रेस्टही याला अपवाद नाहीत. काही महिलांच्या ब्रेस्टचा आकार लहान असतो. काही महिला यावर पॅडेड ब्रा वगैरे असं काहीतरी वापरून तात्पुरता ब्रेस्टचा आकार वाढवतात. तर काही महिला सर्जरी करून कायमचा ब्रेस्टचा आकार वाढवून घेतात. अशीच ब्रेस्ट सर्जरी केली ती अमेरिकेतील एका महिलेने. जिला यानंतर भयंकर परिणामांना सामोरं जावं लागलं.

अमेरिकेतील 35 वर्षांची डार्सी डेव्हिस अलसोप. दुसऱ्या प्रेग्नन्सीनंतर तिच्या ब्रेस्टचा आकार सामान्य आकारापेक्षा खूप कमी होता.  त्यामुळे तिने ब्रेस्ट इम्प्लांट करून घेतलं. यासाठी तिने तीन सर्जरी करून घेतल्या आणि तब्बल 23 लाख रुपये खर्च केले. पण त्यानंतर तिची अशी अवस्था झाली की तिने काही वर्षांत इम्प्लांट काढून टाकलं.

हे वाचा – सोनोग्राफीमध्ये कळालं शरीरात आहेत तीन किडनी, अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याचं डॉक्टरांचं मत

आज तकने इनसाइडरच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार डार्सीने सांगितलं की, सर्वात आधी तिने सेलाइन इम्प्लांट केलं, ज्यात सेलाइनच्या आत सॉल्ट वॉटर भरलं जातं. 9 वर्षांनंतर हे इम्प्लांट तिने काढलं आणि सेलाइनला 210 सीसी सिलिकॉनमध्ये रिप्लेस केलं. पण आणखी 3-4 वर्षांनी तिने सिलिकॉन इम्प्लांटही सर्जरी करून काढून टाकलं.

डार्सीने सांगितलं, ब्रेस्ट इम्पांटनंतर तिच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ लागल्या, तिला थकवा जाणवू लागला, तीव्र डोकेदुखी होऊ लागली. त्यानंतर 2020 साली तिच्या एका मैत्रिणीने ब्रेस्ट इम्प्लांटचं साइड इफेक्ट होऊ शकतं, असं सांगितलं.  त्यानंतर डार्सी अनेक ऑनलाइन फोरममध्ये सहभागी झाली आणि ब्रेस्ट इम्प्लांटमुळे होणाऱ्या आजारांबाबत अभ्यास करायला सुरुवात केली. तिला तिच्या शरीरात १५ साइड इफेक्ट दिसून आले.

हे वाचा – ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा Pregnant झाली महिला

मग काय तिने ब्रेस्टचं सिलिकॉन काढण्याचा निर्णय घेतला. 13 वर्षांनंतर तिने ब्रेस्ट इम्प्लांट काढलं. तिन्ही सर्जरीसाठी 30,000 डॉलर म्हणजे जवळपास 23 लाख रुपयांचा खर्च झाला. आता ती नीट झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News