23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Is it healthy to have potatoes in high cholesterol level in marathi rp


नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : आजकाल लोकांची बिघडलेली जीवनशैली, अनारोग्यदायी आहार आणि चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण जगात प्रत्येक तिसरा व्यक्ती कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहे. शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी कोलेस्टेरॉल महत्त्वाचे आहे. हा एक चरबीयुक्त पदार्थ आहे, जो पचनास मदत करतो. निरोगी राहण्यासाठी, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राखणे खूप महत्वाचे आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग्य आहार आणि शारीरिक व्यायामाचा समावेश केला पाहिजे. हाय कोलेस्ट्रॉरॉल पातळी हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते. हाय कोलेस्ट्रॉरॉल असलेले रुग्ण अनेकदा खाण्यापिण्याबाबत खूप गोंधळलेले असतात. हाय कोलेस्ट्रॉलमध्ये बटाट्याचे सेवन किती आणि कसे असावे, याविषयी (Potatoes in High Cholesterol) जाणून घेऊया.

हाय कोलेस्ट्रॉलमध्ये तुम्ही बटाटे खाऊ शकता का?

healthline.com च्या माहितीनुसार बटाटा फक्त खायलाच स्वादिष्ट नाही तर बटाट्याचे पौष्टिक मूल्य देखील इतर भाज्यांप्रमाणेच जास्त आहे. बटाट्यामध्ये विद्राव्य फायबरसोबतच अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

अनेक विरघळणारे तंतू शरीराच्या योग्य पचनास मदत करतात आणि पित्त आम्ल कमी करण्याचे काम करतात. पित्त आम्ल कोलेस्ट्रॉलशी संबंधित आहे, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते.

तज्ज्ञांच्या मते, विरघळणारे फायबर असलेले पदार्थ उच्च रक्तदाब, खराब कोलेस्टेरॉल आणि शरीरातील जळजळ यासारख्या समस्यांच्या लक्षणांमध्ये खूप आराम देतात.

बटाट्यामध्ये विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अशा लोकांनी बटाटे खायला हरकत नाही. बटाट्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तर कायम राहतेच, पण शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.

हे वाचा –  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

कोलेस्ट्रॉल मेंटेन राखण्यासाठी बटाटे असे खा –

कोलेस्ट्रॉलमध्ये बटाट्याचे सेवन योग्य प्रकारे केले तरच ते सुरक्षित ठरू शकते.

बटाट्याच्या सालींमध्ये सर्वाधिक फायबर असते, त्यामुळे बटाटे सालेसोबतच खा.

बटाटे तेलात तळून घेतल्याने त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, त्यामुळे बटाटे उकडवून किंवा भाजून खावेत.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News