22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Makeup tips, get maximum impact by doing minimal makeup on Ganeshotsav, follow these tips mhpj


मुंबई, 27 ऑगस्ट : गणेशोत्सवाची उत्सूकता सर्वानाच खूप असते. गणेशोत्सवात वेगवगळे देखावे, मखरांची सजावट, वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ यांची रेलचेल तर असतेच पण त्याचबरोबर गणेशोत्सवात छान मेकअप करून चांगला पेहराव करून मिरवणुकीत जाण्याची मजाच वेगळी असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कमी वेळेत छान अशा मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सद्वारे तुम्हाला मिनिमल मेकअपमध्येही मॅक्सिमम इम्पॅक्ट मिळेल.

या गणेशोत्सवाला करा वॉटरप्रूफ आणि हलका मेकअप

– पावसाळ्यात ओलाव्यामुळे त्वचा तेलकट दिसू लागते. त्यामुळे वॉटरप्रूफ मेकअप वापरणे योग्य ठरेल. त्यामुळे त्वचा कमी तेलकट दिसेल आणि मेकअप सुंदर दिसेल. तसेच अधिक गडद आणि जड मेकअपऐवजी, हलका मेकअप निवडा. ज्यामुळे त्वचा नैसर्गिक, निरोगी आणि चमकदार दिसते.

अचानक नेल पॉलिश रिमूव्हर संपलं तर…घरातल्या पदार्थांतूनच करा तयार!

मेकअपसाठी फॉलो करा या टिप्स

– कोणताही मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी क्लींजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा.

– मेकअप करण्यापूर्वी एका सुती कपड्यात बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर चोळा, असे केल्याने मेकअप बराच काळ फ्रेश राहतो.

– कोणत्याही क्रीम किंवा फाउंडेशनचा बेस लावण्यापूर्वी प्राइमर लावा आणि स्किन टोननुसार फाउंडेशन निवडा.

– डोळ्यांचा मेकअप करताना हे लक्षात ठेवा की जर तुम्ही आयशॅडो डार्क लावत असाल तर लिपस्टिक लाइट निवडा.

Skin Care Tips : पार्लरशिवाय काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस, वापरा हे होममेड हेअर रिमूव्हल पॅक

– तुम्ही लाल आणि गडद गुलाबी सारख्या गडद लिपस्टिकसह हलका किंवा सोनेरी डोळ्यांचा मेकअप करू शकता.

– तुम्ही ओठांसाठी मॅट लिपस्टिक आणि डोळे मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी मस्करा, आय लायनर आणि काजळ वापरू शकता.

– मेकअप केल्यानंतर, मेकअप फिक्सर नक्कीच लावा.

– जर तुम्ही गणपतीच्या मिरवणुकीत ढोलपथकात सलवार कमीज किंवा नऊवार नेसून जाणार असाल. तर एक छान फेटा बांधा. याने तुमचा गणपती फेस्टिवल स्पेशल लूक पूर्ण होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News