12.8 C
New York
Monday, March 4, 2024

6 year old girl jump from plane on 12000 feet height sky diving uk youngest sky diver mhpl


लंडन, 23 ऑगस्ट : वय वर्षे फक्त 6… आता या वयात मुलं काय करतात तर सामान्यपणे खेळतात, शाळेत जाणं त्यांनी सुरू केलेलं असतं. अक्षरओळख झालेली असते पण नीट वाक्यही त्यांना बनवता येत नसतात. साधी सायकल चालवतानाही ते धडपडत असतात. असं असताना एखाद्या मुलीने उंच आकाशातून उडी मारण्याचं धाडस केलं असं सांगितलं तर… तुम्हाला साहजिकच विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

यूकेतील 6 वर्षांच्या लोला जो ब्रॅडशोने सर्वांनाच धक्का दिला आहे. मोठी माणसंही विचार करणार नाहीत किंवा करायला घाबरतात ते लोलाने करून दाखवलं आहे. उंच आकाशात उडणाऱ्या विमानातून तिने जमिनीवर उडी मारली आहे. जेव्हा तिने विमानातून उडी मारली तेव्हा विमान तब्बल 12 हजार फूट उंचावर होतं.

हे वाचा – 6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून झुलत होत्या; अचानक झोपाळा तुटला आणि… काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video

वडील गॅरी आणि स्कायडाइव्हर कोचसोबत तिने हे करतब दाखवलं आहे. डेन्मार्कच्या ड्रॉपजोन रिजनमध्ये हे स्कायडाइव्हिंग झालं आहे. इतक्या कमी वयात प्लेनमधूनल उडी मारून तिने नवा रेकॉर्ड बनवला आहे. विच चर्चमध्ये राहणारी 6 वर्षांची लोला जो ब्रॅडशो ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची स्कायडाइव्हर बनली आहे.

गॅरीने द सन वेबसाईटशी बोलताना सांगितलं, लोला तीन वर्षांची होती तेव्हापासून ती विंड टनलमध्ये जाऊ लागली. तिच्या वयाचा होतो तेव्हा मी असं काही करण्याचा विचारही करू शकत नव्हतो. माझ्यात तितकी हिंमत नव्हती. लोलाची हिंमत नेहमी स्टिलसारखी मजबूत राहिली आहे. ती कधीच घाबरत नाही. विमानात प्रौढ व्यक्तीही होत्या ज्या उडी मारायला घाबरत होत्या पण लोलाने न घाबरता विमानातून उडी मारली.

हे वाचा – Shocking! आकाशातून थेट माणसाच्या डोक्यावर; विमानाच्या खतरनाक लँडिंगचा VIDEO VIRAL

भारतात प्रयागराजमध्ये राहणारी 21 वर्षांची अनामिका शर्मा भारतातील सर्वात कमी वयाची लाइसेंस्ड स्काय डाइव्हर आहे.  ती 11 वर्षाची होती तेव्हा तिने 11 हजार फूट उंचावर पहिलं डाइव्ह केलं होतं. 21 वर्षापर्यंत तिने 42 जम्प मारल्या. तिच्याकडे ए कॅटेगिरीचं प्रोफेशनल युनायटेड स्टेट्स पॅराशूट असोसिएशनचं लायसेन्सही आहे. जे दुबई ड्रॉप झोनसाठी मिळालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News