22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Not only missing periods but this are symptoms of pregnancy mhpj


मुंबई, 25 ऑगस्ट : जेव्हा एखादी स्त्री लैंगिकदृष्ट्या सक्रिय असते आणि महिनाभर तिला मासिक पाळी येत नाही, तेव्हा हे निश्चितपणे गर्भधारणेचे लक्षण असू शकते. परंतु मासिक पाळी न येणे याव्यतिरिक्त अजूनही काही लक्षणे आहेत, जी गर्भधारणा झाल्याचे दर्शवतात. असे मेयोक्लिनिकने म्हटले आहे. आजच्या काळात सर्व हार्मोनल समस्यांमुळे मासिक पाळी न येण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत मासिक पाळी चुकली तरच गर्भधारणेचा अंदाज लावणेदेखील चुकीचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गर्भधारणेच्या इतर लक्षणांबद्दल सांगणार आहोत जे मासिक पाळीच्या अनुपस्थितीशिवाय गर्भधारणा दर्शवतात.

जर तुम्हाला सकाळी सकाळी अचानक त्रास होत असेल किंवा दिवस-रात्र उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तर हीदेखील गर्भधारणेची लक्षणे असू शकतात. जर तुम्ही गरोदर असाल तर शरीरात जास्त रक्त निर्माण झाल्यामुळे आणि किडनी अधिक सक्रिय झाल्यामुळे जास्त लघवी तयार होऊ लागते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बाथरूमला जातो. हेदेखील गर्भधारणेचे लक्षण असू शकते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की मासिक पाळी न येण्याव्यतिरिक्त गर्भधारणेची लक्षणे कोणती आहेत.

गर्भधारणेची लक्षणे

स्तनाच्या आकारात फरक

गर्भधारणेच्या एक किंवा दोन आठवड्यांच्या आत, हार्मोनल बदलांमुळे स्तनात जडपणा जाणवतो. हेदेखील गर्भधारणेचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र काही महिन्यांनंतर हार्मोनल बदलांमुळे ते बरे होते. हे गर्भधारणेचे पहिले लक्षण मानले जाऊ शकते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रुटीनमध्ये सामील करा या 4 सवयी, हृदयही राहील निरोगी

उलट्या होणे

जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस होत असेल किंवा दिवस-रात्र उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तर हेदेखील गर्भधारणेचे लक्षण असू शकते. बर्याच लोकांसाठी पहिल्या तिमाहीनंतर हे लक्षण अदृश्य होते.

जास्त लघवी

गर्भधारणेदरम्यान शरीर अधिक रक्त तयार करते. ज्यामुळे मूत्रपिंड अधिक द्रव फिल्टर करतात. त्यामुळे जास्त लघवीची समस्या निर्माण होते.

Health Tips : दुधी भोपळा आरोग्यदायी असला तरी त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला माहीत आहेत का?

थकवा

शरीरात अचानक थकवा जाणवणे हेदेखील गर्भधारणेचे लक्षण असू शकते. कधी कधी थोडा वेळ बसावेसे वाटते किंवा काम करताना थकवा जाणवतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News