27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Three kidneys in body of a businessman is found strange medical case doctor also surprised gh rp


नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : किडनीशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आलंय. कोणत्याही सामान्य माणसाला दोन किडनी (Kidney) असतात, पण एका व्यावसायिकाला एक-दोन नाही तर तीन किडनी असल्याचं कळतंय. याला निसर्गाचा चमत्कार म्हणावं की दुसरं काही, पण हे प्रकरण पूर्णपणे खरं आहे. या व्यावसायिकाला तीन किडनी असल्याची बाब समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुशील गुप्ता (Sushil Gupta) असं त्यांचे नाव आहे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपूर (Kanpur) शहरात हा प्रकार समोर आला. न्यूज 18 शी विशेष संवाद साधताना सुशील गुप्ता यांनी सांगितलं की 2020 मध्ये त्यांनी ब्लॅडरचं ऑपरेशन करण्यासाठी अल्ट्रासाउंड टेस्ट केली होती, तेव्हा त्या अल्ट्रासाउंड टेस्टमध्ये (Ultra Sound) त्यांना तीन किडनी असल्याचं उघड झालं. सुरुवातीला त्यांनी शरीरात तीन किडनी असल्याचं हे प्रकरण फारसं गांभीर्यानं घेतलं नाही; पण काही महिन्यांनी पुन्हा त्यांचा अल्ट्रासाउंड टेस्ट करण्यात आली, त्यात पुन्हा एकदा त्यांच्या शरीरात 3 किडनी असल्याचं कळालं. त्यानंतर त्यांच्या शरीरात तीन किडनी असल्याची खात्री झाली.

कोणताही त्रास नाही

सुशील गुप्ता यांचं वय 52 वर्षे आहे. परंतु, त्यांना आतापर्यंत कोणताही शारीरिक त्रास किंवा कोणतीही अडचण आली नाही. ते आपलं जीवन सामान्यपणे जगत आहेत. आजपर्यंत त्यांना जास्तीच्या किडनीमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या जाणवलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अवयव दान करण्याचा निर्णय –

सुशील गुप्ता यांनी आधीच नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. पण शरीरात 3 किडनी असल्याचं कळाल्यानंतर त्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. जर कोणाला किडनीची गरज असेल आणि ती देण्यास आपण सक्षम असल्यास नक्कीच आपली किडनी दान करेन, असं ते म्हणाले. याशिवाय मृत्यूनंतर आपले सर्व अवयव दान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.

हे वाचा –  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

एका किडनीवरही जगू शकते व्यक्ती –

कोणतीही व्यक्ती एका किडनीवरही जीवन जगू शकते, असं मेडिकल सायन्सने (Medical Science) सिद्ध केलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडनी खराब झाल्या तर अनेक लोक त्यांची एक किडनी त्यांना देतात, जेणेकरून ते एक किडनीसह आयुष्य जगू शकतील.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

तीन किडनीबद्दल काय म्हणाले डॉक्टर –

शरीरात तीन किडनी आढळण्याची प्रकरणं फार दुर्मिळ आहे. अशी प्रकरणं देशात खूप क्वचित आढळतात. यामध्ये कोणताही त्रास नाही, व्यक्तीने आपलं आयुष्य आरामात जगायला हवं. पण जर त्याला काही त्रास किंवा समस्या जाणवत असेल तर त्याने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं ज्येष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. उमेश दुबे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News