13.3 C
New York
Monday, March 4, 2024

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ घरगुती उपचार आहेत प्रभावी; उलट्या-पोटदुखी होईल बंद – News18 लोकमत


मुंबई, 23 ऑगस्ट:  बाहेरचं खाणं चविष्ट आणि रुचकर असतं. मात्र बाहेरच्या खाण्यामुळं काही वेळा पोट बिघडतं. तयार करताना वापरलेले घटक चांगल्या दर्जाचे आहेत की नाही, तेल, ताजेपणा याबद्दल बाहेरच्या जेवणाबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळेच पोट बिघडणं, उलट्या, जुलाब अशा तक्रारी उद्भवतात. हे सारं फूड पॉयझनिंग अर्थात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे घडतं. काही वेळा यापेक्षा भयंकर त्रास होऊन जिवावरही बेतु शकतं. प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारी असतील, तर घरच्याघरी (Home Remedies On Food Poisoning) काही उपाय करता येतात.

बऱ्याचदा बाहेर खाल्लेल्या अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे उलटी, जुलाब, डायरिया, पोटदुखी होते. यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. थकवा आणि अशक्तपणा (Weakness) जाणवतो. यावर काही घरगुती उपाय लगेचच करता येतात.

– लिंबू (Lemon) अनेक आजारांवर गुणकारी असतं. थकवा घालवण्यासाठी लिंबू सरबत पितात. फूड पॉयझनिंगसाठीही एक चमचा लिंबाच्या रसात एक चिमूटभर साखर घालून दिवसातून दोन ते तीन वेळा हे घेतलं तर खूप फायदेशीर ठरतं.

– एका वाटीत थोडं दही (Curd) घेऊन त्यात एक चमचा मेथीचे दाणे घाला. व्यवस्थित एकत्र करू हे मिश्रण न चावता गिळून टाका. पोटदुखी आणि उलट्यांवर हे खूप परिणामकारक ठरतं. मेथीचे दाणे कडू असूनही अतिशय लाभदायी असतात.

– पचनाच्या तक्रारीसाठी आलं आणि मध (Ginger-Honey) गुणकारी असतो. एक चमचा मधात थोडा आल्याचा रस मिसळा. हे मिश्रण घेतल्यानं पोटदुखीवर आराम पडेल.

– एक कप गरम पाण्यात 2 चमचे अ‍ॅपल सीडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) घालून ते पाणी प्यायल्यास फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल.

हेही वाचा- 41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack?

– जिरे (Cumin) थंड व पचनासाठी उत्तम असतात. पोटदुखी असेल, तर थोडे जिरे तव्यावर भाजून त्याची पूड करा. ही पूड सूप किंवा इतर पदार्थांमध्ये घालून घेऊ शकता.

– केळ्यामध्ये पोटॅशिअम असतं. एक केळं दह्यामध्ये कुस्करून घ्या. हे मिश्रण खाल्ल्यानं फूड पॉयझनिंगच्या तक्रारी कमी होतात.

– तुळस (Tulsi) अनेक रोगांवर औषध म्हणून काम करते. सर्दी, खोकल्यासाठी तुळस गुणकारी ठरते. पोटाच्या तक्रारींवरही तुळशीचा उपयोग होतो. एका वाटीत तुळशीचा रस घ्या. त्यात थोडा मध मिसळा. हे दोन्ही एकत्र करून ते खाल्ल्यानं पोटदुखी कमी होते.

घरातील उपलब्ध जिन्नसांपासून फूड पॉयझनिंगच्या तक्रारी सहज दूर करता येतात. रोजच्या वापरातील हे पदार्थ पोटदुखी, उलट्यांच्या समस्येवर रामबाण उपाय ठरतात. मात्र त्रास खूप जास्त होत असेल, तर डॉक्टरांना दाखवून औषधोपचार घेणं योग्य ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News