12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Child with 3 leg baby born in uttar pradesh shamli mhpl


लखनऊ, 22 ऑगस्ट : सामान्यपणे माणसांना दोन हात आणि दोन पाय असतात. पण सध्या अशा बाळाचा जन्म झाल आहे ज्याला दोन हात आहेत पण पाय मात्र तीन आहेत. उत्तर प्रदेशमधील दोन हात आणि तीन पायांच्या या बाळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत. या बाळाला निसर्गाचा चमत्कार मानलं जात आहे.

शामलीच्या भडी भरतपुरी गावात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. 20 ऑगस्टला या बाळाचा जन्म झाला. घरात ही प्रसूती झाली. बाळाला पाहून त्याचं कुटुंबही हैराण झालं.  इतर 2 पायांप्रमाणे बाळाचा तिसरा पायही पूर्णपणे सक्रिय आहे. कुटुंबाच्या मते, पाय सोडता हे बाळ इतर सामान्य मुलांप्रमाणेच आहे. त्याची हालचाल नॉर्मल आहे.

पण तरी बाळ पूर्णपणे ठिक आहे की नाही, त्याला काही समस्या उद्भवू नये म्हणून करनालमधील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. आज तकच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या मते, बाळ पूर्णपणे स्वस्थ आहे. त्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये कोणतीच समस्या समोर आली नाही. त्याची आईही पूर्णपणे निरोगी आहे.

हे वाचा – आश्चर्य! 4 पाय आणि 4 हातांचं बाळ; ‘देवाचा अवतार’ समजतायेत लोक, पण डॉक्टर म्हणाले…

तीन पायाचं बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी डिसेंबर 2021 साली बिहारच्या गोपाळगंजमध्ये तीन हाता-पायाचं बाळ जन्माला आलं होतं. वैकुंठपूर येथील रेवतिथमध्ये राहणाऱ्या रबीना खातून या 30 वर्षीय महिलेला प्रसूती वेदना चालू झाल्यानंतर तिला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. येथे तिने तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला.

बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.  आश्चर्याची बाब म्हणजे कुटुंबीयांनी अल्ट्रासाऊंड चाचणी केली होती. मात्र, अहवालामध्ये याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे वाचा – धक्कादायक! अंघोळ करताना मुलाच्या शरीरात घुसला खतरनाक ‘कीडा’; मेंदू कुरतडून कुरतडून घेतला जीव

बिहारच्या या प्रकरणात माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की काही दोष असल्यानं अशा प्रकारच्या अनैसर्गिक बाळाचा जन्म होतो. लाखामध्ये अशी एखादीच अशी घटना होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News