12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Eating ‘these’ foods with papaya can be harmful to health mhsz gh


नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: आपल्या आहार इतर पदार्थांबरोबरच फळांचाही समावेश करायला हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. आयुर्वेदातही तसं सांगितलं आहे. फळं ही आपल्या शरीराला शक्ती देतात आणि पचायलाही सोपी असतात. पपई (Papaya) हे असं फळ (fruit) आहे, जे वर्षभर बाजारात (market) सहज मिळतं. हे फळ पोटासाठी ( stomach ) सर्वोत्तम मानलं जातं. यामध्ये अशी अनेक पोषकतत्त्वं असतात, जी शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी आदींचा समावेश असतो. पपई केवळ पचनशक्ती चांगली (Papaya Benefits) ठेवत नाही, तर हे फळ हृदयासाठीसुद्धा चांगलं मानलं जातं; पण तुम्हाला माहिती आहे का, पपई खाताना किंवा खाल्यानंतर असे काही खाद्यपदार्थ आहेत, जे खाणं आरोग्यासाठी टाळले पाहिजे. अन्यथा पपई खाणं फायदेशीर नाही, तर नुकसानकारक (Side Effects of Papaya) ठरू शकतं. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला पपईबरोबर कोणते खाद्यपदार्थ खाणं (foods to avoid eating with papaya) टाळावं, याबाबत माहिती देणार आहोत. ‘हर जिंदगी डॉट कॉम’ने याबाबत वृत्त दिलयं.

पपईबरोबर दही खाणं टाळा

दही आणि पपई एकत्र खाणं आरोग्यासाठी (health) हानिकारक मानलं जातं. मात्र, पपईसोबत दही खाल्ल्याने शारीरिक हानी होते, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. पण आयुर्वेदात असं न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण पपई उष्ण असते, आणि दही खूप थंड असतं. त्यामुळे त्यांचं एकत्र सेवन केल्यास सर्दी, ताप , डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला दही खायचं असेल, तर पपई खाल्ल्यानंतर तासाभराने दही खावं.

हेही वाचा – डायबिटीज असली तरी बिनधास्त खाऊ शकता ‘ही’ 5 फळं; मिळतात ‘इतके’ आरोग्य फायदे

कारलं खाणं अयोग्य

पपईबरोबर कारलं खाऊ नये, असं करणं शरीराला नुकसानकारक आहे. कारण पपईमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तर कारलं शरीरातील पाणी शोषून घेतं. त्यामुळे पपई आणि कारलं एकत्र खाल्यास शरीरात अ‍ॅसिडिक रिअॅक्शन होते, तसंच डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. पपई चवीला गोड असते, आणि कारलं चवीला खूप कडू असतं, त्यामुळे तोंडातील चव खराब होऊ शकते. विशेषतः मुलांना या दोन गोष्टी एकत्र खायला देऊ नयेत.

पपई आणि संत्री एकत्र खाऊ नका

फळं आरोग्यासाठी चांगली मानली जातात. पण बऱ्याचदा काही फळांचं सेवन एकावेळी करू नये. पपई आणि संत्री या दोन्ही फळांचं एकत्र सेवनही आरोग्यासाठी योग्य नाही. संत्र आंबट आणि पपई हे गोड फळ असल्याने पपईसोबत संत्री खाऊ नाही. ही दोन्ही फळे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास अतिसार, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या देखील उद्भवू शकते.

लिंबू खाणं टाळा

अनेकांना पपईचा चाट खाण्याची सवय असते. अशावेळी ते पपई कापल्यानंतर त्यावर लिंबू पिळून खातात. पण तसं करणं टाळा. पपईबरोबर लिंबाचं सेवन केल्यास शरीरात पचनाच्या समस्या निर्माण होतात. पपईबरोबर लिंबू सेवन केल्याने रक्ताशी संबंधित विकार होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन कधीही करू नका.

बारा महिने सहज बाजारात मिळणारं फळ म्हणजे पपई. हे फळ खाण्याचे जसे फायदे आहेत, तसे काही पदार्थ्यांसोबत तिचे सेवन करणं नुकसानकारक सुद्धा आहे. त्यामुळे पपई खाण्याची योग्य पद्धत आत्मसात करणे हे आरोग्यासाठी केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News