23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Gemstone Diamond jewellery 2 gems considered effective but also dangerous mhpj


मुंबई, 22 ऑगस्ट : कुंडलीतील ग्रहस्थिती आणि नक्षत्रांचा जन्म व्यक्तीच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार आणि घटनांनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्न हे सर्वांनाच आवडतात. पण कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. रत्न शास्त्रामध्ये अशा दोन रत्नांचे वर्णन आहे, जे परिधान केल्याने माणसाच्या जीवनावर खूप खोल परिणाम होतो. ही रत्ने जितकी शक्तिशाली आहेत तितकीच ते धोकादायक आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा त्या दोन्ही रत्नांबद्दल सांगत आहेत.

हिरा रत्न

हिरा नवरत्नांमध्ये सर्वात मौल्यवान, कठोर आणि चमकदार रत्न आहे. त्यामुळे हिऱ्याचे तेज सर्वांनाच आकर्षित करते. हिरा धारण केल्याने माणसाला सुख, शांती, साधन आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यासोबतच हिऱ्याचा प्रभाव व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही पडतो.

Gemstone: ही 4 रत्न धारण करण्याचे आहेत विशेष फायदे; नशीब बदलण्यास वेळ नाही लागत

हिरा घालण्याचे नियम

ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला हिरा फलदायी असेल तर तो त्या व्यक्तीचे नशीब उजळू शकतो, परंतु हिरा घालण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विचार न करता हिरा धारण केल्याने नुकसान होऊ शकते. व्यक्तीलाही तोटा सहन करावा लागू शकतो.

अशा व्यक्ती ज्यांना मधुमेह, रक्ताशी संबंधित आजार आहेत, त्यांनी हिरा अजिबात घालू नये. वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर अशा व्यक्तींनी हिरा घालू नये. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की 21 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती हिरा घालू शकते.

नीलम रत्न

नीलम हे ज्योतिष आणि रत्नशास्त्रातील दुसरे सर्वात शक्तिशाली रत्न मानले जाते. यासोबतच हे रत्नही तितकेच धोकादायक आहे. नीलम हे शनिदेवाचे रत्न मानले जाते. शनिदेवाच्या उग्र स्वभावामुळे नीलम रत्न चुकीच्या पद्धतीने धारण केल्याने ते दारिद्र्याचे कारण बनू शकते.

Ganesh Rudraksha : तुमच्या मुलांना जरूर घाला गणेश रुद्राक्ष; होतात ‘हे’ फायदे

नीलम रत्न धारण करण्याचे नियम

अनेकदा लोक नकळत सोन्यामध्ये किंवा कोणत्याही मिश्र धातूमध्ये नीलम रत्न घालतात, परंतु हे योग्य नाही. जर एखाद्या व्यक्तीला नीलम धारण करायचे असेल तर ते लोखंडी किंवा चांदीच्या अंगठीतच परिधान करावा. याशिवाय नेहमी चौकोनी आकाराचा नीलम घालावा. नीलम हे शनिदेवाचे रत्न मानले जाते, म्हणूनच शनिवारी पूजा केल्यानंतर मध्यरात्री ते धारण करावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News