12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Marathi horoscope 23 august 2022 rashibhavishya rashifal rashichakra zodiac sign


आज दिनांक 23 ऑगस्ट 2022. वार मंगळवार. आज श्रावण कृष्ण द्वादशी आहे. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरूसोबत योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

दशम स्थानातील शनी भ्रमण कार्यालयीन गाठभेट, संपर्क, घराविषयक घडामोडी दाखवत आहे. काहीसे निराश वाटेल. जपून रहा. चंद्र तृतीय स्थानात आहे. प्रवास होतील. दिवस मध्यम.

वृषभ

शुक्राचा कर्क राशीतील प्रवेश आनंद निर्माण करेल. कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या घटना घडतील. आई-वडील भेट होईल. व्यय राहू चिंता देईल. संतती सुख मिळेल. दिवस बरा आहे.

मिथुन

राशीच्या अष्टम स्थानामध्ये शनी मोठा बदल करेल. प्रकृती नाजूक राहील. संतती सुख मिळेल. चंद्र-शुक्र भ्रमण खरेदी, प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क

सप्तम स्थानात वक्री शनी काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता. व्यय चंद्र गृहक्षेत्रात घडामोडी होतील. खर्च होईल. नातेवाईक भेट होईल. दिवस मध्यम.

सिंह

लाभस्थानात चंद्र आर्थिक बाबतीत काळजी घ्या, असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ.

कन्या

दशम स्थानातील चंद्र व्यावसायिक शत्रूपासून सुटका देईल. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ देईल. अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तूळ

संतती चिंता, शिक्षणात अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या. भाग्य स्थानात चंद्र भ्रमण संततीसाठी खर्च करावा लागेल, असं सुचवत आहे. दिवस मध्यम.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असून नातेसंबंध जपण्याचे संकेत देत आहे. आर्थिक व्यय, शत्रू पिडा संभवते. अष्टम चंद्र आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

धनु

चतुर्थ स्थानात गुरू वास्तू योग आणेल. भावंडं भेटतील. त्यांना जपा. कार्यालयीन कामात खूप वेळ जाईल. जबाबदारी वाढेल. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम.

मकर

वक्री शनी राशीत आहे. हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष धार्मिक काम निघेल. षष्ठ चंद्र आरोग्य चिंता लावेल. मध्यम दिवस.

कुंभ

व्यय स्थानात वक्री शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. पंचम चंद्र संततीबाबत काही ताण निर्माण होण्याची शक्यता. दिवस उत्तम.

मीन

व्यय स्थानातील शनी आणि चतुर्थ चंद्र जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक ताण संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू जोडीदाराला शुभ फल देईल. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News