22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Steel glass inside man stomach inserted in private parts by friends while party removed surgically in odisha mhpl


भुवनेश्वर, 22 ऑगस्ट : मित्रमैत्रिणी म्हणजे मजामस्ती आलीच. पण काही वेळा मजेमजेत असं काही घडतं की त्याचा भयंकर परिणाम होतो. मित्रांनी केलेल्या अशाच विचित्र मस्तीचाभयंकर परिणाम भोगावा लागतो आहे तो ओडिशातील एका व्यक्तीला. मित्रांसोबत त्याने दारू पार्टी केली. त्यानंतर नशेत मित्रांनी त्याच्यासोबत जी मस्करी केली त्यामुळे त्याची अवस्था भयंकर झाली आहे. त्याचा वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याच्या कुटुंबासह डॉक्टरही शॉक झाले.

ओडिशातील 45 वर्षांचा कृष्णा राऊत गुजरातच्या सूरतमध्ये काम करतो. 10 दिवसांपूर्वी त्याने आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या पोटात आणि मागील भागात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याच्या मित्रांनी त्याच्यासोबत नको ती मस्करी केली होती. याची त्याला माहिती होती पण त्याने आपल्या कुटुंबाला काही सांगितलं नाही. पण नंतर वेदना इतक्या तीव्र झाल्या की त्याला सहन होत नव्हत्या. अखेर तो गुजरातहून ओडिशातील आपल्या मूळ गावी परतला.

हे वाचा – पॉटी होईना म्हणून डॉक्टरांकडे नेलं; एक्स-रेमधून बायकोसमोर आलं नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य

तिथं गेल्यानंतर त्याच्या पोटात सूज आली आणि त्याला शौचालाही होईना. तेव्हा त्याने कुटुंबाला या समस्येबाबत सांगितलं आणि त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. तिथं त्याच्या काही तपासण्या केल्यानंतर त्याला एक्स-रे रिपोर्ट काढायला सांगितला. त्यानंतर त्याच्या पोटात जे दिसलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या पोटात चक्क एक स्टिलचा ग्लास होता. पार्टीवेळी तो नशेत होता तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याच्या गुद्द्वारातून ग्लास शरीराच्या आत टाकला.

हे वाचा – Shocking! स्वप्नात मांस कापता कापता प्रत्यक्षात ‘तो’ भाग कापला; जाग येताच हातातील तुकडा पाहून हादरला

डॉक्टरांनी सुरुवातीला गुद्द्वार मार्गातून  ग्लास बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण तो निघाला नाही. अखेर त्याची सर्जरी करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार एमकेसीजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सर्जरी झाली. आतडी कापून त्यातून ग्लास बाहेर काढण्यात आला. सर्जरीनंतर आता त्याची तब्येत सुधारते आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News