12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Best Pure Veg restaurant near me in Dadar mhsa


मुंबई, 21 ऑगस्ट: अलीकडे लोकांचं जीवन प्रचंड गतिमान झालंय. प्रत्येकावरच कामाचा प्रचंड ताण असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. कामाच्या धबडग्यात दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही. खासकरून मुंबईसारख्या चोवीस तास सुरु असणाऱ्या शहरात आपण आपलं स्वत्वच हरवून बसतो. लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. आठवडाभर कामात झोकून दिल्यानंतर आठवड्यातील एक दिवस स्वतःसाठी आणि कुटूंबासाठी देणंही महत्त्वाचं आहे. कुटूंबासोबत जर तुम्ही एखाद्या बेस्ट हॉटेलला भेट दिली, तर तुम्हाला तुमच्या कुटूंबासोबत वेळही घालवता येईल आणि चांगल्या पदार्थांचा आस्वादही घेता येईल, तसेच तुम्ही रिलॅक्सही होऊन जाल.

सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेकजण मांसाहार करणं टाळतात आणि शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत लोक शाकाहारी रेस्टॉरंटच्या शोधात असतात. तुम्ही जर दादरमध्ये असाल आणि तुम्हालाही आपल्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत चविष्ट जेवणाचा आनंद लुटायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला दादर जवळच्या काही खास शाकाहारी हॉटेलची (Best Veg Restaurants in Dadar, Mumbai)  माहिती देणार आहोत.

1. अपूर्व डिलिशियस (Apoorva Delicacies)-

तुमच्या शहरातून (मुंबई)

पत्ता: 2RFQ+989, रानडे रोड, शुश्रुषा हॉस्पिटल समोर, दादर पश्चिम, शिवाजी पार्क, मुंबई, महाराष्ट्र 400028

फोन: 022 2445 5964

ऑर्डर: swiggy.com

2. रामकृष्ण प्युअर व्हेज (Ramakrishna pure veg)-

पत्ता: 178, कावरणा मॅन्शन, दादर पुणे एशियाड स्टँडच्या समोर, डॉ.बी.आंबेडकर रोड, दादर, मुंबई, महाराष्ट्र 400014

फोन: 022 2411 2076

हेही वाचा- Best Restaurants in Thane: खवैय्ये आहात? ‘ही’ आहेत ठाण्यातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट, मिळेल चविष्ट जेवण

3. प्रकाश शाकाहारी उपहार केंद्र (Prakash Shakahari Upahar Kendra)

पत्ता: 9/10, होरायझन बिल्डिंग, गोखले रोड नॉर्थ, दादर वेस्ट, मुंबई , महाराष्ट्र ४००२८

फोन: +912224386094

4. हॉटेल मनोहर (Hotel Manohar)-

पत्ता: 13, गिरधारी सदन, एन सी. केळकर रोड, कोहिनूर स्क्वेअर समोर, दादर वेस्ट, शिवाजी पार्क, मुंबई , महाराष्ट्र- 400028

फोन: 022 2430 6513

5. संस्कृती, दादर (Hotel Sanskruti)-

पत्ता: शॉप नं-1, जुने सावन भवन, नायगाव क्रॉस रोड, दादर ईस्ट, दादर, मुंबई, महाराष्ट्र ४००१४

फोन- 9870303675

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News