12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Best vegetables liver in Marathi rp


नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : यकृत (लिवर) हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. लिवर अशा अनेक गोष्टी करते ज्याद्वारे आपले शरीर अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास सक्षम बनते. उदाहरणार्थ, अन्नाचे पचन, चयापचय चांगले ठेवणे, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात साठवणे, रक्तातील विषारी गोष्टी फिल्टर करणे, प्रथिने संश्लेषित करणे इ. Eatthis च्या माहितीनुसार, यकृत खराब झाल्यास ते स्वतः आपोआप पुन्हा दुरुस्त होऊ शकते. मात्र, ते पूर्णपणे आपण काय खातो-पितो यावर अवलंबून असते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी असे बरेच पदार्थ आहेत, विशेषतः भाज्या यकृत निरोगी ठेवण्यास आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात. येथे आम्ही तुम्हाला अशा 4 भाज्यांबद्दल सांगत आहोत ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे यकृत निरोगी ठेवू (Best Vegetables For Liver) शकता.

यकृत निरोगी ठेवणाऱ्या भाज्या –

बीटरूट –

बीटरूट ही एक भाजी आहे जी चवीच्या बाबतीत सर्वांनाच कदाचित आवडणार नाही. परंतु, जर तुम्ही त्याचा रस प्यायला तर ते तुमचे यकृत निरोगी ठेवण्यास खूप मदत करू शकते. यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे यकृताला कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून वाचवण्याचे काम करतात.

ब्रोकोली –

संशोधनात असे आढळून आले आहे की, ब्रोकोलीच्या सेवनाने फॅटी लिव्हर डिसीज किंवा लिव्हर ट्यूमरची समस्या दूर ठेवली जाऊ शकते. ब्रोकोली तुम्ही कच्ची आणि शिजवूनही खाऊ शकता. कोणत्याही प्रकारे, त्याचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

हे वाचा – डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

ब्रुसेल्स स्प्राउट्स –

ब्रसेल्स स्प्राउट्स पचन सुधारतात आणि त्यातून जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. एवढेच नाही तर यकृताला चांगले काम करण्यासही मदत होते. हे यकृत आणि फुफ्फुसांमध्ये डिटॉक्सिफायिंग एंजाइम सोडते. भाजून किंवा वाफवून तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.

हे वाचा – ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

हिरव्या पालेभाज्या

पालक, कॉलर्ड ग्रीन यासारख्या पालेभाज्या देखील यकृताच्या एकूण आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. या अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध मानल्या जातात. ज्या यकृतासह शरीराच्या अनेक अवयवांना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News