22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Corona death increasing who chief tedros adhanom ghebreyesus said coronavirus is not end be alert mhpl


जिनिव्हा, 19 ऑगस्ट : सध्या लोकांवर कोणतेही कोरोना निर्बंध नसल्याने कोरोना संपलाच असंच सर्वांना वाटतं आहे. त्यामुळे सर्वलोक बिनधास्त आहे. ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोणत्या नियमांचं पालन. पण कोरोना अद्यापही गेलेला नाही आहे. उलट कोरोनाचं भयावह रूप समोर आलं आहे. कोरोना बळींचा आकडा वाढला आहे, हा आकडा पाहून जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) हादरली आहे आणि त्यांनी संपूर्ण जगाला अलर्ट केलं आहे.

कोरोना नियंत्रणात आला असं वाटत असताना आता त्याने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतासह जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोना मृत्यूच्या प्रकरणात वाढ झाल्याची माहिती डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. ट्रेड्रॉस अॅधेनॉम घेब्रयसेस यांनी दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार गेल्या चार आठवड्यांत जगातील कोरोना मृत्यूच्या संख्येत 35 टक्के वाढ झाली आहे.

हे वाचा – नागपूरकरांनो सावधान! कोरोनासोबत वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका

डॉ. टेड्रॉस म्हणाले, “कोरोनाचं हे सलग तिसरं वर्ष आहे. आपण सर्व कोरोनाव्हायरस आणि महासाथीला थकलो आहोत पण व्हायरस थकला नाही.  गेल्या चार आठवड्यात 15 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या 35 टक्क्यांनी वाढली आहे. आपल्याकडे संक्रमण रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्व संसाधनं असूनही मृत्यूचा वाढलेला आकडा हैराण करणारा आहे”

“कोरोना नष्ट झाला हे आपण म्हणू शकत नाही. कोरोनाचा खात्मा अद्याप झालेला नाही. त्यामुळे यापासून आपण स्वतःचा आणि इतरांचा बचाव करायला हवा. बचावाचे उपाय कायम करायला हवं. मास्क घालायला हवा, सोशल डिस्टन्सिंग राखायला हवं. प्रत्येक व्यक्तीने लस आणि गरज पडल्यास बुस्टर डोस जरूर घ्यावा”, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

भारतात कोरोनाची परिस्थिती काय?

केंद्र सरकारने  19 ऑगस्ट रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत कोरोनाचे 15,754 नवी प्रकरणं आढळली आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4,43,14,618 झाला आहे. दैनिक संक्रमण दर 3.47 टक्के आणि साप्ताहिक संक्रमण दर 3.90 टक्के आहे. तर दिवसभरात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या आता 5,27,253 वर पोहोचली आहे. मृत्यु दर 1.19 टक्के आहे.

हे वाचा – धोका वाढला! पहिल्यांदाच माणसामुळे श्वानाला मंकीपॉक्सची लागण; WHO ने केलं अलर्ट

दिवसभरात 647 रुग्ण तर एकूण 4,36,85,535 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट 98.58 टक्के आहे.  सध्या  1,01,830 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजे एकूण प्रकरणांच्या 0.23 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News