25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Do these 5 home remedies to get rid of acidity mhsz


नवी दिल्ली, 20 ऑगस्ट:  बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle Changes) काही आजारांनी माणसाच्या शरीरात कायमस्वरुपी घर केलं आहे. अ‍ॅसिडिटी, मलावरोध (Constipation) हे त्यापैकीच काही. या आजारांनी सध्या अनेक लोकांना ग्रासलं आहे. जेवणाच्या अनियमित वेळा, बदललेला आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण व अपुरी झोप ही यासाठीची प्रमुख कारणं आहेत. वास्तविक हे आजार गंभीर स्वरुप धारण करण्याआधी घरच्याघरी (Home Remedies) त्यावर उपचार करता येतात. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या अनेक गोष्टी या आजारांपासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरतात. घरच्याघरीच त्यावर काही तोडगे मिळू शकतात. झी न्यूज हिंदीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

घरगुती उपायांमध्ये आहार व व्यायाम हे दोन महत्त्वाचे घटक असतात. स्वयंपाकघरातील काही मसाले व इतर पदार्थ औषध म्हणून वापरता येतात. त्यापैकी काही म्हणजे आलं, बडिशेप, ओवा, लवंग, वेलदोडा हे मसाल्याचे पदार्थ.

हेही वाचा –  Food Expiry Date : एक्स्पायरी डेटवर अवलंबून राहू नका; हे खाद्यपदार्थ त्याआधीही होऊ शकतात खराब

आलं-बडिशेप व पुदिना

जेवण झाल्यावर पाचक म्हणून बडिशेप किंवा सुपारी खाल्ली जाते. अन्नाचं पचन होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुदिना आणि आलंही (Ginger) पोटासाठी फायदेशीर असतं. थोड्या पाण्यात आलं, बडिशेप आणि पुदिन्याची पानं घालून उकळावी. सकाळच्या वेळी हे पाणी प्यावं. आल्यातील जिंजरोल या खास घटकामुळे ते पचनासाठी उत्तम ठरतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. पुदिना आणि बडिशेपही पोट साफ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

लवंग-वेलदोडा

मलावरोधाची समस्या, पित्त वाढलं असेल व पोटात सूज असेल तर लवंग व वेलदोडा उपयोगी पडतो. यात कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात. यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux) सुधारतो. वेलची थंड असल्यामुळे पोटातील दाह कमी होतो व त्याचा मलावरोध कमी करण्यात फायदा होतो.

हेही वाचा –  फिल्टर वॉटर की उकळलेले पाणी? निरोगी आरोग्यासाठी काय जास्त उपयोगी

कोमट पाण्याचं नियमित सेवन

कोमट पाणी (Warm Water) अनेक आजारांवरचं औषध आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर दोन भांडी कोमट पाणी प्यावं. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास यामुळे मदत होते व शरीराला पुरेसा पाण्याचा पुरवठाही होतो.

योगासनं करा

पोटदुखी, करपट ढेकर व मळमळणं अशी अनेकांना पोटाची तक्रार असते. यावर योगासनं (Yoga) औषध म्हणून उपयुक्त ठरतात. त्यातलं सुप्त बद्ध कोनासन सर्वांत प्रभावी ठरतं. या आसनाला रेक्लायनिंग बाउंड अँगल पोझ असं इंग्रजीत म्हणतात. पचनासंदर्भातील तक्रारींवर याचा खूप फायदा होतो.

मसालेदार जेवण टाळा

पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहार सर्वांत महत्त्वाचा असतो. मसालेदार (Spicy), तिखट व चिकट आहारामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे पित्त, मलावरोधाच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे असा आहार टाळावा. त्याऐवजी कमी मसालेदार सूप, भाज्या, डाळी, दूध व दही यांचा समावेश आहारात करावा. यामुळे पोटातील दाह कमी होऊन पित्त कमी होतं.

घरगुती उपायांमुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम न होता आजारांपासून सुटका होते. मात्र या उपायांनी बरं वाटलं नाही, तर वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News