26.9 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Extreme case of monkeypox nose rotten due to virus mhpl


बर्लिन, 19 ऑगस्ट : त्वचेवर येणारे पुरळ, फोड हे मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. पण एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सच भयानक लक्षण दिसलं आणि त्यामुळे त्याची अवस्था इतकी भयंकर झाली ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. या व्यक्तीमध्ये जे लक्षण दिसलं ते मंकीपॉक्सचं असावं याचा अंदाजा सुरुवातीला डॉक्टरांनाही आला नाही आणि त्याची अवस्था अधिक गंभीर झाली तेव्हा त्याला मंकीपॉक्स झाल्याचं निदान झालं.

जर्मनीतील ही मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती जिचं नाक पूर्णपणे सडलं आहे. सुरुवातीला त्याच्या नाकावर एक लाल रंगाचा छोटासा डाग होता. हे नेमकं काय आहे, हे माहिती करून घेण्यासाठी, तपासण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला. पण डॉक्टरांनीही त्याच्या फार तपासण्या केल्या नाहीत. सनबर्न असल्याचं सांगून त्यांनी त्याला घरी पाठवलं.

पण हळूहळू त्याच्या नाकाची अवस्था भयंकर होऊ लागली. त्याचं नाक काळं पडू लागलं. नाकाला छेद झाला आणि तो पसरू लागला.  मेडिकल जर्नलमध्ये नमूद केल्यानुसार या व्यक्तीच्या चेहऱ्याशिवाय त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येही जखम झाली आहे.

हे वाचा – बापरे! आता मासे-खेकड्यांनाही कोरोना? कोव्हिड टेस्टचा VIDEO आला समोर

इन्फेक्शन भरपूर पसरल्यानंतर तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याची नीट तापसणी केली. तेव्हा त्याला मंकीपॉक्स झाल्याचं निदान झालं. सोबतच तो एचआयव्ही संक्रमित असल्याचंही समजलं.  इन्फेक्शननंतरच आपल्याला आजार झाल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

फोटो सौजन्य - Boesecke, C., Monin, M.B., van Bremen, K. et al

फोटो सौजन्य – Boesecke, C., Monin, M.B., van Bremen, K. et al

त्याला अँटिव्हायरल मेडिसीन देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे त्याच्या शरीरावरील काही भागाच्या जखमा सुकल्यात. पण नाक जसं आहे तसंच आहे. त्याने आपल्या नाकाचा फोटो शेअर केला. जो पाहून सर्वजण घाबरले आहेत. मंकीपॉक्स अशीही अवस्था करू शकतो, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News