23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Health tips bottle gourd juice side effects rp


मुंबई, 20 ऑगस्ट : दुधी भोपळा ही आरोग्यासाठी एक उत्तम भाजी आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन कंट्रोल आणि इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. परंतु, दुधी भोपळ्याचा रस विशेषत: रिकाम्या पोटी पिणं कधी-कधी घातक ठरू शकतं. दुधी जरा जास्तच कडू असेल तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते.

अनेक पारंपारिक उपचार करणारे आणि सोशल मीडियावर झालेल्या प्रचारामुळे दुधीच्या ज्सुसला अलिकडे भरपूर मागणी आहे. त्यामुळे उद्यानांबाहेर आणि आजूबाजूला अशा ज्युसचे स्टॉल्स वाढले आहेत. हेल्थ फायदे असल्याच्या माहितीमुळे अनेकजण तो पिऊ लागले आहेत.

हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दुधीचा रस प्यायल्यानंतर लगेच विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे तीव्र उलट्या होणे, रक्तदाब कमी होणे आणि वरच्या आतड्यांसंबंधी रक्तस्त्रावाचे प्रॉब्लेम होत आहेत. दुधी भोपळ्याचे आरोग्याला कसे साईड इफेक्ट होऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया.

हे वाचा – पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार

तज्ज्ञांचे मत काय?

क्युकर्बिटॅसी (Cucurbitaceae) वर्गातील असल्याने दुधीची चव कडू आणि त्यात क्युकरबिटासिन नावाचे विषारी टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनॉइड संयुगे असतात. यातून होणाऱ्या विषारी परिणामावर कोणतेही ठोस औषध नाही आणि डॉक्टर अशा रुग्णांवर केवळ लक्षणात्मक उपचार करतात. या संभाव्य जीवघेण्या विषबाधेच्या हानिकारक प्रभावांबद्दल लोकांना जागृत करणे महत्त्वाचे आहे.

अलीकडच्या काळात असे आढळून आले आहे की, दुधीच्या कडवट रसाचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. कडूपणा, पोटदुखी, उलट्या, जुलाब, हेमेटेमेसिस, हेमॅटोचेझिया, धक्का बसणं आणि त्यामध्ये मृत्यू यासारखी गंभीर लक्षणही दिसून येत आहेत.

हे वाचा – Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम

दुधीचा रस कसा घ्यावा?

दुधीचा रस बनवण्यापूर्वी किंवा कोणत्याही स्वरूपात वापरण्यापूर्वी त्याचा एक छोटा तुकडा कापून त्याची कच्ची चव घ्या. जर त्याची चव जास्त कडू असेल तर शक्यतो वापरू नका. चव चांगली असेल तर ज्यूस करायला हरकत नाही. पाण्याने पूर्णपणे दुधी स्वच्छ धुवून घ्या आणि बॅक्टेरियाची वाढ टाळण्यासाठी लगेचच 2 मिनिटांच्या आत तयार केलेला रस प्या.

विषबाधेमुळे भारतात अनेक मृत्यू आणि गंभीर आजार होत असतात. दुधीविषयी बोलायचे झाल्यास शिजवलेली भाजी खाणेच फायदेशीर आहे. दुधीचा रस पिणे शक्यतो टाळावे. दुधी शिजवून खाणे आरोग्यासाठी चांगले राहील, आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये हिच पद्धत वापरली जात असून ती योग्य आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News