27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

पोट वाढण्याच्या चिंतेने गरोदर महिलेने उचललं असं पाऊल; पाहूनच सर्वांना बसला धक्का


लंडन, 29 सप्टेंबर : प्रेग्नन्सी म्हटलं की महिलांंमध्ये बरेच शारीरिक बदल दिसून येतात. पोट, छातीचा आकार वाढू लागतो. काही महिलांचं वजन इतकं वाढतं की त्या लठ्ठही होतात. त्यामुळे प्रेग्नंट झाल्याचा आनंद महिलांना असतोच पण त्यासोबतच आता आपलं पोट मोठं होणार, आपलं वजन वाढणार याची चिंताही त्यांना सतावत असते. अशाच चिंतेतून एका महिलेने प्रेग्नन्सीतही पोट वाढू नये, म्हणून गरोदरपणाच्या कालावधीत ती खूप धावली, इतकंच नव्हे तर तिने जिममध्ये जाऊन एक्सरसाइझ केली. त्यानंतर तिचं जे झालं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

ब्रिटनच्या एसेक्समधील असलेली डानी लेव्ही सध्या तिचा होणारा नवरा मारबेलासोबत स्पेनमध्ये राहते. प्रेग्न्सीच्या सातव्या आठड्यात तिला आपण प्रेग्नंट असल्याचं समजलं. लॉस एंजिलन्सहून ती घरी जात होती. तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. तिने घरी जाऊन स्वतःची प्रेग्नन्सी टेस्ट केली. तेव्हा तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण प्रेग्नंट असल्याचं समजताच तिला आनंद झाला. पण सोबतच ती घाबरलीसुद्धा. आता आपलं बेबी बम्प दिसू लागेल, याची भीती तिला वाटू लागली.

डानी एक फिटनेस स्पेशालिस्ट आहे. त्यामुळे पोट वाढू नये, म्हणून प्रेग्नंट असतानाही ती जिममध्ये घाम गाळू लागली. जिममध्ये ती एक्सरसाइझ करते. प्रेग्नन्सीच्या इतक्या कालावधीनंतरही ती दर आठवड्याला तीन ते चार वेळा 40 मिनिटं धावते. डाएटचीही काळजी घेते.

हे वाचा – ज्या मुलाला दिला जन्म, त्याच मुलाच्या बाळाची आई होणार महिला

सोशल मीडियावरही ती आपले प्रेग्नन्सीतील जिममधील एक्सरसाइझजे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत अपडेट देत असते. तिचे हे फोटो, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News