27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Health avoid these foods for weight loss know healthy tips from dietician rp


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : आज-काल मोठ्या संख्येने लोक आपले वजन कमी करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. वजन कमी करण्यासाठी चांगला डाएट प्लॅन असणे आवश्यक आहे. आपण आहाराकडे लक्ष दिले आणि व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्या तर नक्कीच वजन कमी करणे सोपे होईल. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज आपण मेदांता हॉस्पिटलच्या माजी आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांच्याकडून जाणून घेणार आहोत, वजन कमी करताना कोणते पदार्थ टाळावेत. वजन कमी करताना लोकांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे देखील यावरून तुम्हाला (Avoid These Foods for Weight Loss) कळेल.

वजन कमी करताना या चुका टाळा –

आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात की, वजन कमी करण्यासाठी नेहमी योग्य पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. वजन कमी करण्याशी आहाराचा थेट संबंध आहे. खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही तर वजन कमी होत नाही. काही लोक वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. असे केल्याने वजन लवकर कमी होईल असे त्यांना वाटते, पण तसे नसते. जास्त वेळ उपाशी राहिल्याने चयापचय मंदावते. यामुळे पित्ताचा त्रास, भूक न लागणे आणि निद्रानाश होऊ शकतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी दररोज प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक तत्वांनी युक्त नाश्ता केला पाहिजे. भरपूर पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हे पदार्थ टाळा –

काही लोकांना फळे खायला आवडतात. वजन कमी करण्यासाठी खाण्याऐवजी ते दिवसातून अनेक वेळा फळे खातात, परंतु असे करू नये. आंबा, चिकू, द्राक्षे आणि केळीमध्येही कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढते.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही फ्राय आणि तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. पकोडे, ब्रेड पकोडे, बटाटा पराठा, सँडविच आणि कचोरी अशा पदार्थांपासून लांबच राहा. तेलकट पदार्थ खाऊ नका.

चपाती आणि भात माफक प्रमाणात खावे. दोन्हीमध्ये पौष्टिक मूल्य समान आहे. गव्हाच्या पिठात ज्वारी, बाजरी मिक्स करू शकता. त्यात ग्लूटेन असते आणि कॅलरी वाढते.

हे वाचा – Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम

अनेकजण मटणाचे शौकीन असतात, पण यामुळे वजन वाढू शकते. वजन कमी करायचे असेल तर मटण टाळा. त्याऐवजी, तुम्ही लीन चिकन आणि अंडी खाऊ शकता. मात्र, त्याचे प्रमाण देखील कमी असावे.

चीज, दूध, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर चरबी असते आणि यामुळे वजन कमी करणे अवघड होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी कमी प्रमाणात खाव्यात. हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्वे मिळतील आणि वजन कमी करणे देखील सोपे होईल.

हे वाचा – पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News