22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Photography of prime minister narendra modi on occasion worldphotographyday rp


नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आज 19 ऑगस्ट रोजी जगभरात ‘जागतिक छायाचित्रण दिन’ साजरा केला जात आहे. या दिवशी छायाचित्रण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित केले जाते. याबाबतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चांगले फोटो घेणाऱ्या छायाचित्रकारांना प्रोत्साहित करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:ला फोटोग्राफीची आवड आहे. राजकीय जीवनात असतानाही त्यांनी आपल्या फोटोग्राफीचा छंद जपला आहे. त्यांचे मित्र-सहकारी त्यांच्या फोटोग्राफीचे आजही कौतुक करतात. पीएम मोदींना फोटोग्राफीबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी आहे. नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया अकाउंट बघून देखील हे कळू शकते.

कधी सेलेब्स सोबत तर कधी सर्व सामान्यांसोबत सेल्फी घेताना पंतप्रधान मोदी दिसतात. पंतप्रधान असले तरी अनेकदा ते स्वत: कॅमेरा हातात धरून फोटोग्राफी करू लागतात.

फोटोग्राफर हर्ष शहा यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी एक चांगले फोटोग्राफर आहेत. आम्ही जेव्हा भाजप कार्यालयामध्ये भेटत होतो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, जेव्हा खूप ऍडव्हान्स कॅमेरा लेन्स नव्हते त्यावेळीही त्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली होती आणि तेथील फोटो काढले होते. त्यावेळचे त्यांचे फोटो खरंच पाहण्यासारखे आहेत आणि फोटो प्रदर्शन करण्याइतपत ते चांगले आहेत. तसेच एखाद्या छायाचित्रकाराचा चांगला फोटो वर्तमानपत्रात छापून यायचा, त्यावेळी ते त्याला अधिक प्रोत्साहित करायचे.

ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांनीही सांगितले की, नरेंद्र भाई मोदी चांगले फोटो काढणाऱ्यांचे नेहमी कौतुक करत असायचे. गुजरातमध्ये एकदा दुष्काळ पडलेला असताना दुष्काळाची भीषणता दर्शवणारा एक फोटो इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झाला होता. विहिरीत खाली उतरून छायाचित्रकाराने वरती पाणी काढतानाचा एक फोटो घेतला होता, त्या फोटोवरून नरेंद्र मोदी यांनी संबंधित शैलेश नावाच्या छायाचित्रकाराला फोन करून त्याचे कौतुक केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News