3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

नारळ पाणी सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं, अशा लोकांनी पिताना काळजी घ्या


मुंबई, 29 सप्टेंबर : सुपर फूड मानलं जाणारं नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, काही लोकांना नारळ पाणी प्यायल्यानंतर त्रास होऊ शकतो. नारळ पाण्यात कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. शरीराला हायड्रेट करण्यासाठी आणि इलेक्ट्रोलाइट रचना सुधारण्यासाठी ते उपयुक्त आहेत. पण काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, याचा अर्थ असा नाही की नारळाचे पाणी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकते. वेबएमडीच्या माहितीनुसार, ज्या लोकांना रक्तदाब किंवा पोटॅशियमची समस्या आहे, त्यांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळ पाण्याचे सेवन करावे.

नारळाच्या पाणी कोणासाठी त्रासदायक ठरतं –

इलेक्ट्रोलाइट असंतुलन –

ज्या लोकांना जास्त पोटॅशियमची समस्या आहे, त्यांच्यात नारळ पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. वास्तविक, नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्सपेक्षा जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटॅशियमची पातळी झपाट्याने वाढते आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

कमी रक्तदाब –

नारळ पाण्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळ पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढणे –

नारळाच्या पाण्यात कॅलरीज जास्त असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतील आणि तुमचे वजनही वाढेल.

सिस्टिक फायब्रोसिस –

सिस्टिक फायब्रोसिस ही एक अनुवांशिक स्थिती आहे, जी शरीरातील मिठाची पातळी कमी करू शकते. नारळ पाण्यात खूप कमी सोडियम आणि भरपूर पोटॅशियम असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सिस्टिक फायब्रोसिसचा त्रास असेल तर मिठाची पातळी वाढवण्यासाठी नारळ पाणी पिऊ नका.

हे वाचा – हेअर ट्रान्सप्लांटमुळे तरुणाचा मृत्यू ; दिल्लीत घडली विचित्र घटना

मूत्रपिंड समस्या –

नारळ पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच किडनीची समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारळ पाण्याचे सेवन करा.

हे वाचा – कधी करू शकतो गर्भपात; अबॉर्शनसाठी कोणती पद्धत असते सुरक्षित?

शस्त्रक्रिया –

तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा शस्त्रक्रिया करणार असाल, तर आधी किंवा नंतर रक्तदाब संतुलित असणे आवश्यक आहे. नारळ पाणी तुमचा रक्तदाब कमी करू शकते, त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आसपास नारळाचे पाणी घेऊ नका.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News