27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

निरोगी हृदयासाठी अक्रोड खाणे आहे सर्वोत्तम; ‘हार्ट डे’निमित्त जाणून घ्या फायदे – News18 लोकमत


मुंबई, 29 सप्टेंबर : खराब जीवनशैली आणि आहार हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण मानले जाते. आपण आपले शरीर शक्य तितके सक्रिय ठेवणे आणि निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या नियमित आहारात अक्रोडाचा समावेश केला तर त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहील. अक्रोड खाल्ल्याने हृदयाला धोकादायक आजारांपासून संरक्षण मिळते आणि मृत्यूचा धोका कमी होतो. जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे 1.83 कोटी लोक आपला जीव गमावतात. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकार नियंत्रित ठेवता येतो. जाणून घेऊया हृदय आणि अक्रोडाचा संबंध.

BMI उत्तम राहतं –

संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक त्यांच्या आहारात अक्रोडाचा समावेश करतात त्यांचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स कमी होता. त्यामुळे त्यांचे हृदयही निरोगी होते.

रक्तदाब

अक्रोडाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, त्यामुळे आर्ट अटॅकचा धोका कमी होतो, असेही आढळून आले आहे.

रक्त ट्रायग्लिसराइड पातळी –

अक्रोडाच्या सेवनाने रक्तातील हाय ट्रायग्लिसराइड पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे रक्त हृदयरोग आणि स्ट्रोकची शक्यता कमी होऊ शकते.

हे वाचा – हृदयविकाराचा झटका कोणालाही येतोय; आजपासून खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल

कोलेस्टेरॉल पातळी –

अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या होण्याची शक्यताही कमी होते.

फायदेशीर का आहे?

अक्रोडमध्ये अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर असतात. जरी ते इतर सुक्या फळांमध्ये देखील आढळतात, परंतु अक्रोडमध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक ऍसिड म्हणजेच एएलए विशेषत: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

हे वाचा – फिट आणि तंदुरुस्त सेलिब्रिटींना कसा काय हार्ट अटॅक येतो? सर्वांनीच या गोष्टींची काळजी घ्यावी

दिवसात किती अक्रोड खाणे फायदेशीर?

जर तुम्ही रोजच्या आहारात 1 औंस म्हणजेच 7 अक्रोडांचा समावेश केला तर त्यामुळे हृदय आरोग्य चांगले राहू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News