12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Shree krushna janmashtami, what to do and what to avoid on Janmashtami? mhpj


मुंबई, 18 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्मोत्सवाची आपण सर्वजण अगदी जय्यत तयारी करतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. या दिवशी खास जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. श्रीकृष्णाची जयंती भाविक मोठ्या उत्साहात साजरी करतात. श्रीकृष्ण पूजेत त्यांचे आवडते कपडे अर्पण केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या कृष्ण जयंतीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कोणत्या गोष्टी करणे प्रकर्षाने टाळावे. याबद्दल माहिती देणार आहोत.

जन्माष्टमीला या गोष्टी कराव्या

– जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या आवडीचे मोरपीस पूजेच्या सर्व वस्तूंच्या मध्ये ठेवावे. त्यासोबतच श्रीकृष्णांच्या आवडीची खीर, पंचामृत, मिठाई, लोणी अशा वस्तू ठेवाव्या.

– पूजा करताना शंखाचा उपयोग करावा.

– जन्माष्टमीच्या पूजेला तुळशीचे पान नक्की वाहावे.

– या दिवशी पूजेमध्ये श्रीकृष्णाला कमळाचे फुल अर्पण करणेदेखील चांगले असते.

– जन्माष्टमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.

– आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी बाळ कृष्णाला झुला झुलवावा.

– शक्य असेल तर कृष्ण जन्माच्या दिवशी घरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम करावा.

Janmashtami 2022: भगवान श्रीकृष्ण मोरपंखी मुकुट धारण करण्याचेही आहे खास कारण

जन्माष्टमीला या गोष्टी करणे टाळा

– टीव्ही नाईन हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्णाची पूजा करताना सुकलेली फुले अजिबात वापरू नये.

– श्रीकृष्ण आणि गायींचे खूप घट्ट नाते आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही गायीला इजा पोहोचवू नये.

– जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करताना तामसी प्रवृत्तीचे पदार्थ खाऊ नये. यादिवशी मांस, माद्य घेऊ नये.

Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?

– जन्माष्टमीच्या दिवशी मनात चुकीचे विचार अनु नये किंवा कुणाला अपशब्द बोलू नये.

– जन्माष्टमीच्या पूजेसाठी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावी. त्या दिवशी तुळसाच काय कोणतेही झाड तोडू नये.

– जन्माष्टमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News