22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Using mosquito repellent to keep mosquitoes away can be dangerous for skin health mhpj


मुंबई, 17 ऑगस्ट : पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार पसरतात. हे टाळण्यासाठी लोक मॉस्किटो रिपेलंट क्रीम किंवा तेल वापरतात. सहसा हे क्रीम आणि तेल हात आणि पायांच्या त्वचेवर लावले जाते. काही लोक ते मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर देखील लावतात. मॉस्किटो रिपेलंट क्रीम त्वचेवर लावल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. कोणत्या लोकांनी या प्रकारची क्रीम किंवा तेल लावू नये, हे तुम्हाला त्वचारोगतज्ज्ञांकडून कळेल. तसेच ते सुरक्षितपणे कसे वापरावे.

GSVM मेडिकल कॉलेज कानपूर येथील सहाय्यक प्राध्यापक आणि त्वचाविज्ञानी डॉ. युगल राजपूत यांच्या मते, मॉस्किटो रिपेलेंट क्रीम आणि तेलांमध्ये काही रसायने वापरली जातात. या रसायनांमुळे डास चावत नाहीत. काही लोकांसाठी, या गोष्टींचा वापर हानिकारक ठरत नाही. परंतु संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांवर त्याचे खूप वाईट परिणाम होतात.

Skin Care Tips: पिंपलपासून बचावासाठी ‘या’ गोष्टी टाळा, चेहरा दिसेल सुंद

या रसायनांमुळे संवेदनशील त्वचेवर अॅलर्जी आणि एक्जिमासारख्या समस्या उद्भवू शकतात. Mosquito Repellent Cream किंवा तेल लावल्यानंतर तुम्हाला त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येत असल्यास, तुम्ही ते ताबडतोब बंद करावे. या समस्यांपासून दूर राहून तुम्ही क्रीम्स आणि तेलांचा वापर करत राहिल्यास त्वचेवर फोड येऊ शकतात.

Increase Eyesight : निरोगी डोळ्यांसाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; मिळतील सर्व पोषक घटक

डॉ.युगल राजपूत सांगतात की मुलांची त्वचा अतिशय मऊ आणि संवेदनशील असते आणि त्यावर मॉस्किटो रिपेलंट लावू नये. याशिवाय वृद्धांची त्वचाही कोरडी असते आणि त्यामुळे त्यांनी त्याचा वापर टाळावा. आता या लोकांना डासांपासून वाचवायचे कसे? तर यावर त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुले आणि वृद्धांनी त्वचेऐवजी कपड्यांवर मॉस्किटो रिपेलंट लावावे. पूर्ण कपडे परिधान करा आणि त्यावर मॉस्किटो रिपेलंट लावा. मुलांच्या बाबतीत पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संवेदनशील त्वचा असलेल्या सर्व वयोगटातील लोकांनी या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. समस्या वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News