22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

व्यक्तिविशेष  .. अनाथ, वंचित मुलांचे   मार्ग दाते……  पुरुषोत्तम चौधरी

 

चंद्रपूर जिल्ह्यातील   धान  पट्टा व झाडीपट्टी  म्हणून ओळख असलेल्या ब्रह्मपुरी  तालुक्यातील  सायगाव  येथे  पुरुषोत्तम जगन्नाथ चौधरी त्यांचा जन्म 15 जून 1967 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
घरी  दीड एकर कोरडवाहू शेती आई-वडील कष्टकरी तेच संस्कार पुरुषोत्तम  वर रुजले,! अवघे विश्वचि माझे घर !ही मनोधारणा बनत गेली. अत्यंत गरीब परिस्थितीत न डगमगता त्यांनी  उच्च शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन तालुक्याच्या. ठिकाणी त्यांनी  ब्रह्मपुरी येथे एम काम एम  ऍड ,पर्यंत शिक्षण घेतले.  उच्च शिक्षण घेऊन  ते नोकरीच्या शोधात मुंबई येथे सुद्धा काही  वर्ष त्यांनी काम केले. मात्र शिक्षणासाठी आपल्याला काबाडकष्ट करावे लागले. त्याची जाण मनाशी धरून  गोरगरीब व प्रयत्नशील , वंचित तरुणांना  शिक्षणाच्या मुख्य  प्रवाहात आणण्याचं त्यांचे स्वप्न असल्याकारणाने ते  आपल्या स्वगृही जिल्ह्यात म्हणजेच चंद्रपुरात दाखल झाले. प्रथमता   वंचित व अनाथ मुलांसाठी स्वखर्चाने स्नेहदीप बाल सदन ची स्थापना केली. इथपर्यंतचा प्रवास हा  खडतर संघर्षमय वाटेने जाणारा होता. हे काम जरी अवघड असले तरी, त्यांची मनाची अस्वस्थता प्रवाहाविरुद्ध काम करायला पुढे सरसावली. आणि या बाल सदन मध्ये वंचित शोषित शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या विद्यार्थ्यांना निवासी भोजनाची व शिक्षणाची सोयी उपलब्ध करून त्यांनी मायेचा आधार दिला . कोणतेही आर्थिक पाठबळ पाठीशी नसताना व शासनाची  कोणतेही अनुदान न घेता स्वबळावर अनाथाची पालन-पोषण करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली दरम्यान ही धुरा सांभाळत असताना त्यांनी वेळ प्रसंगी चंद्रपुरात काबाडकष्ट करून प्रसंगी रिक्षा चालवून हे  बाल संगोपन केंद्र  चालवीत आहे. अनेक  सेवाभावी संस्था चे ते संस्थापक म्हणून कार्यरत आहे.
पुरुषोत्तम  चौधरी त्यांच्यावर स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी बाबा आमटे त्यांच्या विचाराचा प्रभाव  आहे. या मुलांच्या  शिक्षणासाठी   धडपड करत आहे. कशाचीही अपेक्षा न बाळगता स्वबळावर अनाथाची   सेवा,पालन-पोषण करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली दरम्यान ही धुरा सांभाळत असताना त्यांनी वेळ प्रसंगी चंद्रपुरात काबाडकष्ट करून प्रसंगी रिक्षा चालवून हे  बाल संगोपन केंद्र चालविले.
पुरुषोत्तम बर स्वामी विवेकानंद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी बाबा आमटे त्यांच्या विचाराचा प्रभाव होता. या मुलांच्या शिक्षणाचा व पालनपोषणाचा खर्च म्हणून व कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी चंद्रपुरातील नामवंत  उद्योजक डी आर पत्तीवार यांच्या चंद्र धून या वृत्तपत्रात जाहिरात व्यवस्थापक म्हणून  वृत्तपत्राची जबाबदारी  सांभाळली आहे. व  या वृत्तपत्राचे मालक-चालक झाले आहे .दैनिक चंद्र परीक्षण केलं मला करेक्शन नव्हतं झालं धून व पावर सिटी या वृत्तपत्राचे संपादन देखील करून  त्यांना न्याय देण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी. याकरिता वृत्तपत्राची धुरा  संपादक म्हणून समर्थपणे पेलत आहे.  बेरोजगाराची समस्या दूर व्हावी व त्यांना  स्वयम रोजगार, व्यवसाय शिक्षण घेऊन रोजगार मिळावा ,व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी 2002  मध्ये सुशिक्षित बेरोजगार  संस्थेची स्थापना केली .आजतागायत ही संस्था फार मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार देण्यात सक्षम झाली आहे.  दरम्यान भविष्यातील आर्थिक बाबींचा मेळ बसावा व तरुणांना  बचत ची सवय लागावी   या उदात्त हेतूने 2002 मध्ये डी विदर्भ नागरी पतसंस्थेची उभारणी केली. ही संस्था बाबुपेठ येथे कार्यरत आहे. पुरुषोत्तम चौधरी हे एक अजब रसायन आहे.   एवढ्यावरच न थांबता मना त सतत काहीतरी करण्याची उर्मी ठेवून नवीन सकारात्मक  गोष्टीकडे   त्यांचा क ल आहे. 2008 स*** पुरुषोत्तम दिवाळी निमित्त गावात आला .नापिकी ने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या   नापिकीसाठी,होत आहेत, लोक गाव सोडून जात आहेत .मुले रस्त्यावर येत आहेत .शिक्षणापासून वंचित होत आहे या वास्तवाने तो हादरला . माझे आयुष्य शिक्षणाने उभा राहिलं, या मुलांचं भवितव्य काय ?या अवस्थेतून त्यांनी नागभीड व ब्रह्मपुरी येथे मूकबधिरांसाठी निवासी संस्था स्थापन केली व मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खऱ्या प्रवाहात आणण्याचं मोलाचं काम स्वबळावर आज पर्यंत अविरतपणे चालू आहे. शेतकरी कुटुंबातील व वंचित घटकातील पन्नास-साठ मुलांचे संगोपन व शिक्षण स्वतःच्या मिळकतीतून करीत आहे स्वतः मुलाकडे लक्ष देत आहे. हा शेतकऱ्यांचा पोरगा शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी काम करतोय बघून त्यांची  सहचारिणी  सौ गीता देखील त्यांच्या या कार्याला मोलाची साथ देत आहे.  ते कधी कधी आपली व्यथा मांडताना सांगतात की लग्नासाठी मुलगी द्यायला  काहीनी नाकारले. चांगल्या कामाला साथ मिळतेच पुरुषोत्तम ला गीता ही विवेकी साथीदार मिळाली .आयुष्यभर कोणती तक्रार केली नाही व खंबीरपणे उभी आहे . बाबुपेठ  येथे  स्नेहदीप बाल सदन ची स्थापना झाली, आज या वटवृक्षाच्या रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊन त्यांचे काम विस्तारलेले आहे. या अनाथांच्या संगोपन संस्थेत विदर्भासह चंद्रपूर-गडचिरोली या आदिवासीबहुल भागातील पन्नास निवासी मुले वंचित घटकातील, कचरा गोळा करणारी, भीक मागणारी दुसरी ते बारावीपर्यंतची मुले आहेत स्वतःच्या आनंदी कुटुंबासमवेत या लेकरांचे हे दांपत्य माय बाप आहे. ही संस्था म्हणजे मन शिक्षणाची कार्यशाळा होय.  वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अनेक पुस्तकांचा संचय करून वाचनालय ची सुद्धा सोय केलेली आहे वाचलेल्या पुस्तकावर मुले खुली चर्चा करतात .मुलांनी झाड बेली सारखे फुलावे . बहरावे.मुलांनी  मुलांसाठी साठी काम करावे. ही व्यवस्था पुरुषोत्तम चौधरी यांनी केली आहे. संस्थेचा खर्च वाढला महागाई वाढली अशातही या संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी खंबीरपणे आपलं स्नेहदीप प्रमाणे संस्थेचे कार्य पुढे नेत आहे. कर त्याला कृतीचा ,आणि दात्याला अज्ञानाचा अहंकार ,आला तर कर्मातील चैतन्य निघून जातील. याची त्यांना पूर्ण जाणीव आहे . शेवटी त्यांची शासनाकडे अपेक्षा आहे . की ,या कृतिशील , संवेदनशील कार्य करणाऱ्या संस्थेला अनुदान द्यावे, जेणेकरून अनात व वंचित मुलांना कृतिशील शिक्षण देता येईल…….
अशा या कर्तुत्ववान  मित्राला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.   ………. प्रभाकर आवारी, चंद्रपूर,9975373673

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News