22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

आज विनायक चतुर्थी, गणपतीसोबत दुर्गामातेचा मिळेल आशीर्वाद; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत


मुंबई, 29 सप्टेंबर : आज आश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी व्रत आहे. या दिवशी उपवास करण्यासोबतच गणेशाची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र सुरू असून आज त्याचा चौथा दिवस आहे. आज आपण कुष्मांडाची पूजा करतो. आज विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पासोबत देवी दुर्गेची कृपा होण्याचा सुंदर योगायोग आहे. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी विनायक चतुर्थीच्या व्रताची शुभ वेळ आणि उपासनेची पद्धत सांगत आहेत.

विनायक चतुर्थी 2022 –

हिंदू कॅलेंडरनुसार, आश्विन शुक्ल चतुर्थी तिथी बुधवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 01.27 वाजता सुरू झाली आहे आणि ही तारीख आज दुपारी 12.08 वाजता संपणार आहे. अशा परिस्थितीत आज विनायक चतुर्थी व्रत ठेवण्यात आले आहे.

विनायक चतुर्थी पूजा मुहूर्त –

सप्टेंबर महिन्यातील विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.00 ते दुपारी 01.23 पर्यंत आहे. आज आपल्याला गणेश पूजेसाठी तुम्हाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे.

रवियोगातील विनायक चतुर्थी –

आजची विनायक चतुर्थी रवि योगात आहे. हा योग अशुभ दूर करून शुभ प्रदान करणारा आहे. आज रवि योग सकाळी 06.13 ते उद्या पहाटे 05.13 पर्यंत आहे. सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, परंतु तो उद्या सकाळी 05.13 ते 06.13 पर्यंत फक्त एक तासाचा आहे.आज दोन शुभ मुहूर्त आहेत. सकाळी 06.13 ते 07.42 पर्यंत शुभ वेळ आहे. दुसरा लाभ – उन्नती मुहूर्त हा दुपारी 12.11 ते 1:41 पर्यंत आहे.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत –

आज सकाळी स्नान करून विनायक चतुर्थीचे व्रत व पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणेशाची पूजा करावी. गणेशाला लाल फुले, अक्षता, कुंकू, चंदन, धूप, दिवा, गंध, नैवेद्य इत्यादी अर्पण करा. त्यानंतर दुर्वा डोक्यावर ठेवा आणि मोदक किंवा लाडू अर्पण करा.

हे वाचा –  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

यानंतर गणेश चालीसा, विनायक चतुर्थी व्रत कथेचे पठण करावे. त्यानंतर देवी दुर्गेची पूजा करावी. लाल फुले, अक्षत, कुंकू, धूप, दीप, गंध, दही, खीर इत्यादी अर्पण करून कुष्मांडाची पूजा करावी. त्यानंतर दोघांकडून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News