23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

नवरात्रीचा चौथा दिवस, सोबत विनायक चतुर्थी; तुमच्यावर काय होणार कृपा? पाहा राशिभविष्य


आज दिनांक 29 सप्टेंबर 2022. वार गुरूवार. आश्विन शुक्ल चतुर्थी. विनायकी चतुर्थी. आज देवीचे कुष्मांडा स्वरूपात पूजन केले जाईल. चंद्र तूळ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीतील राहू आणि सप्तम चंद्र केतू जोडीदाराची चिंता वाढवेल. राशीतील शुक्र बुध शुभ घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक, मानसिक ताण घेऊ नका. दिवस उत्तम.

वृषभ

आज षष्ठात चंद्राचे भ्रमण मध्यम फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे. बंधुभेट होईल. दिवस शुभ आहे .

मिथुन

राशी स्वामी बुध कन्या राशीत सूर्यासोबत आहे. सरकारी काम, लिखाण यात यश मिळेल. शुक्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण गृह लाभ घडवेल. शुभ कार्य होतील. दिवस चांगला.

कर्क

आज चतुर्थ स्थानात चंद्र केतू असून काही संकेत मिळतील. भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेल. सप्तम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस मध्यम आहे.

सिंह

आज चंद्र भ्रमण तृतीय स्थानात असून प्रकृती बरी राहिल. मन थोडे चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत राहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस चांगला.

कन्या

धन स्थानातील चंद्र आर्थिक यश देईल. आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघं मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. लाभ होतील. दिवस उत्तम.

तूळ

चंद्राचे भ्रमण राशी स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. भावंडांचे सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा.

वृश्चिक

काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहिल. लाभ होईल पण खर्च जपून करा. घर ही तुमची प्राथमिकता राहिल. दिवस मध्यम आहे.

धनु

आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. प्रवास होतील. दिवस शुभ.

मकर

शनी तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. खर्चाचं, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. दशम चंद्र व्यवसायात कष्ट करायला भाग पाडेल. दिवस शुभ.

कुंभ

आज विशेष घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका.अन्यथा कारवाईला समोर जावं लागेल. दिवस मध्यम.

मीन

राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र भरपूर काम देईल. जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News