25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

औषधी गुणधर्म असले तरी आल्याचे अतिसेवन हानीकारक ठरू शकते, हे त्रास होतात


मुंबई, 28 सप्टेंबर : आल्याचा चहा प्यायला सगळ्यांनाच आवडते आणि जवळपास प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या पदार्थात आल्याचा वापर केला जातो. आलं अनेक औषधी उपायांमध्येही वापरले जाते. खोकला, सर्दी-पडसं असताना आल्याचा काढा किंवा चहा पिणे खूप फायदेशीर ठरते. आलं आहारात घेणे फायदेशीर असले तरी तुम्ही जास्त प्रमाणात आलं वापरत असाल, तर असे करणे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. यामुळे हृदयाशी संबंधित काही समस्या आणि अतिसार इ. समस्या. गरोदर महिलांमध्ये जास्त आल्याचे सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका वाढतो. आल्याचे काही दुष्परिणाम येथे जाणून घेऊया.

छातीत जळजळ

स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, जर आलं जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते छातीत जळजळ, पोट खराब होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

रक्तस्त्राव होऊ शकतो –

आल्यामध्ये अँटी-प्लेटलेट गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. लवंगासारख्या मसाल्यासोबत जास्त घेतल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका आणखी वाढू शकतो.

हे वाचा – World Rabies Day 2022: आज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार

अतिसार होऊ शकतो –

आल्याचे सेवन केल्याने तुमच्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो आणि अतिसाराचा धोका वाढू शकतो. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग होऊ शकतात.

हे वाचा –  या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

पोटात अस्वस्थता –

आले मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते, मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या जसे पोट बिघडणे इ.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News