23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी या 4 गोष्टी अवश्य कराव्यात – News18 लोकमत


नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कित्येक लोकांना पाळीव प्राणी घरात ठेवणे आवडते. पाळीव प्राण्यांची लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते. पाळीव प्राण्यांची, विशेषत: ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांनी प्राण्यांची नियमित तपासणी आणि लसीकरण करणे फार महत्त्वाचे आहे. पाळीव प्राण्यांमुळे होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा लहान बाळाला सर्वाधिक धोका असतो. प्राण्यांशी संबंधित संसर्ग आणि रोगांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो. रेबीज दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांना रेबीजशी संबंधित माहिती देणे हा आहे. हा रोग संक्रमित प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो, जो काही वेळा प्राणघातक ठरू शकतो. घरातील पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेतल्यास रेबीजसारख्या धोकादायक आजारापासून प्राणी आणि स्वतःचे प्राण वाचू शकतात.

पाळीव प्राण्यांचे लसीकरण –

जर घरात पाळीव प्राणी असतील तर त्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. लहान बालकाचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी जशी लसीकरणाची गरज असते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणेही महत्त्वाचे आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या म्हणण्यानुसार, पाळीव प्राण्यांना लहानपणापासूनच योग्य लस दिली तर त्यांना हा आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. पाळीव प्राण्यांना नियमित पशुवैद्यकीय डॉक्टरांना दाखवले पाहिजे.

पाळीव प्राणी चावणे आणि नख्या ओरबडणे –

पाळीव प्राण्यांच्या चाव्याव्दारे आणि नखांच्या ओरखड्यांमुळे होणारे संक्रमण टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यापासून लांब राहणे, त्यांचे लसीकरण करणे. एखादे मांजर, कुत्रा किंवा इतर प्राण्याने कधीही नख्या ओरबडल्या तर प्रभावित क्षेत्र ताबडतोब कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करा. रेबीज किंवा इतर संक्रमित रोगाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

हे वाचा – World Rabies Day 2022: आज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार

वारंवार हात धुवा –

पाळीव प्राण्यांशी संबंधित संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. पाळीव प्राणी, त्यांची लाळ किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यानंतर हात कोमट पाण्याने आणि साबणाने चांगले धुवावेत. याशिवाय पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे.

इतर प्राण्यांपासून दूर ठेवा –

पाळीव प्राण्यांना इतर वन्य किंवा रस्त्यावरील प्राण्यांपासून संसर्ग होण्याची शक्यता असते. पाळीव प्राण्यांना त्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखले पाहिजे. पाळीव प्राण्यांच्या संसर्गामुळे मुलांनाही धोका होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News