3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

गुडघ्याच्या जुनाट ऑस्टिओआर्थ्रायटिसचा त्रास सर्जरीशिवाय कमी होऊ शकतो का? वाचा तज्ज्ञांचं मत


मुंबई, 27 सप्टेंबर: गुडघेदुखीचा त्रास होत असलेल्यांची संख्या सध्या वाढत आहे. गुघडेदुखीशी संबंधित ऑस्टिओआर्थ्रायटिसचा आजारही अनेकांना जडत आहे. त्यात गुडघ्यांच्या सांध्यांना आधार देणाऱ्या आर्टिक्युलेट कार्टिलेजला अधिक नुकसान पोहोचत आहे. कार्टिलेज म्हणजे हाडांना जोडणारी एक प्रकारची गादी असते. ही गादी एखाद्या कुशनप्रमाणे काम करते. कार्टिलेजमुळे हाडांचं एकमेकांशी घर्षण होत नाही व दुखापत झाल्यास त्यापासून संरक्षणही मिळतं.

नवी दिल्लीतल्या इंडियन स्पायनल इंज्युरी सेंटरचे कन्सल्टंट पेन फिजिशियन डॉ. विवेक लुंबा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, कार्टिलेजचं नुकसान होतं तेव्हा हाडांचे एकमेकांशी घर्षण होत असतं. या स्थितीत असह्य त्रास होऊ शकतो. यालाच ऑस्टिओआर्थ्रायटिसचा आजार असं म्हटलं जातं. ज्येष्ठांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. गुडघे आणि पाठीवर ऑस्टिओआर्थ्रायटिसचा अधिक परिणाम होत असतो.

ऑस्टिओआर्थ्रायटिससाठी सर्जरी किती आवश्यक:

ऑस्टिओआर्थ्रायटिसचा आजार झाला म्हणजे शस्त्रक्रिया अर्थात सर्जरी हा एकमेव पर्याय असल्याचं मानलं जातं. याबाबत बोलताना डॉ. विवेक लुंबा म्हणाले, की ऑस्टिओआर्थ्रायटिसची प्राथमिक लक्षणं असल्यास त्यावर सर्जरीशिवाय उपचार करता येतात. त्याकरिता विशिष्ट प्रकारचे व्यायाम आवश्यक आहेत. ऑस्टिओआर्थ्रायटिसमध्ये चालणं, सायकल चालवणं आणि आयसोमेट्रिक आणि आयसोटोनिकसारखे गुडघ्यांचे व्यायाम केल्यास वेदनेपासून दिलासा मिळू शकतो. सांधेदुखीचा त्रास नाहीसा व्हावा म्हणून वजन नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वजन अधिक असेल तर गुडघ्यांवर अधिक ताण पडतो आणि त्यामुळे त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. व्यायाम करून वजन घटवण्यात यशस्वी ठरलात तर गुडघेदुखीपासून निश्चितच फायदा मिळू शकतो.

हेही वाचा: तुमच्या मुलाचाही हाईटचा प्रॉब्लेम आहे? फॉलो करा या 5 टिप्स, टीनएजनंतरही वाढेल उंची

 या आजारावर कुठलं औषध प्रभावी:

तज्ज्ञांच्या मते, ऑस्टिओआर्थ्रायटिसमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी काही औषधं उपयुक्त ठरतात. यात अ‍ॅसिटोमिनोफेन, एनएसएआयडीएस यांसारख्या आयब्युप्रोफेन किंवा ऑटोशाइनसारख्या औषधांचा समावेश होतो. ही औषधं घ्यायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. याशिवाय एनएसएआयडीएससारखं व्होलिनी जेल लावल्यानंतरही वेदनपासून आराम मिळू शकतो. वेदना अधिक असतील, तर ट्रामाडोलसारख्या औषधांचे सेवन करता येऊ शकतं.

ऑस्टिओआर्थ्रायटिसची लक्षणं:

रक्तात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं तेव्हा ऑस्टिओआर्थ्रायटिसचा धोका अधिक असतो. वास्तविक पाहता हे एकमेव कारण नाही. गुडघेदुखी हे ऑस्टिओआर्थ्रायटिसचं पहिलं लक्षण आहे. याशिवाय गुडघ्याजवळ सूज, थोडंसं काम केलं तरी गुडघेदुखीचा त्रास जाणवणं ही काही प्रमुख लक्षणं आहेत. हाडातून जेव्हा आवाज यायला लागतो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यायला हवा. ऑस्टिओआर्थ्रायटिसचा धोका पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक असतो. ज्या महिलांचं वजन अधिक असते त्यांना याचा धोका जास्त असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News