22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

डेंग्यूमध्ये चुकूनही घेऊ नका ही औषधं, प्लेटलेट्स कमी होण्यासोबतच रक्तस्रावाचा वाढेल धोका – News18 लोकमत


मुंबई, 27 सप्टेंबर : गेल्या काही आठवड्यांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पावसानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूचेही प्रमाण वाढते. डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो विषाणूची लागण झालेल्या डासाच्या चावण्यामुळे मानवांमध्ये पसरतो. डेंग्यूवर योग्य वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. काही लोक ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे सुरू करतात.

डेंग्यूच्या बाबतीत असे करणे खूप धोकादायक ठरू शकते आणि प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे अंतर्गत रक्तस्रावासह अनेक धोके उद्भवतात. अशा परिस्थितीत डेंग्यू झाल्यास कोणते औषध घेणे सुरक्षित आहे आणि कोणती औषधे टाळावीत, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेतली जातात.

सायनस इन्फेक्शनमुळे खूप त्रास होतोय? ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा

तज्ज्ञांकडून जाणून घ्या डेंग्यूचा ताप कसा असतो?

नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या फिजिशियन डॉ. सोनिया रावत यांच्या मते, डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे आणि त्याची लक्षणे अतिशय सामान्य आहेत. एडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे त्याचा प्रसार होतो. डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. लक्षणे दिसल्यावर लोकांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी उपचार करणे घातक ठरू शकते.

डेंग्यूच्या तापाची लक्षणे

– उच्च ताप

– शरीर दुखणे

– डोकेदुखी होणे

– उलट्या होणे

– पोटदुखी

– अशक्तपणा येणे

– जास्त थकवा

– कमी प्लेटलेट संख्या

डेंग्यूमध्ये ही औषधे ठरू शकतात जीवघेणी

डेंग्यूमध्ये पॅरासिटामॉलचा वापर सर्वात सुरक्षित मानला जातो, असे डॉ.सोनिया रावत सांगतात. हे औषध ताप कमी करू शकते आणि शरीराच्या वेदनापासून आराम देऊ शकते. लोकांनी त्याचा डोस वजनानुसार घ्यावा. काही लोक शरीरदुखी, डोकेदुखी, पोटदुखी यासारखी औषधे घेतात. परंतु यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते. विशेष म्हणजे डेंग्यू हा विषाणूजन्य ताप असल्यामुळे त्यात अँटिबायोटिक्स घेऊ नयेत. यामुळे प्लेटलेट कमी होण्याचा धोकाही वाढतो. लिव्हरचे विकारही या औषधांमुळे होऊ शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही काही औषधे घेऊ शकता.

रक्त अशुद्ध झाल्यास आरोग्यासोबत त्वचेवरही होतात वाईट परिणाम, हे पदार्थ रक्त ठेवतील शुद्ध

कमी प्लेटलेट्समुळे अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निरोगी लोकांमध्ये प्लेटलेटची संख्या 1.5 लाख ते 4 लाखांपर्यंत असते. डेंग्यूमुळे प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात आणि काही वेळा स्थिती गंभीर होते. जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात. तेव्हा मेंदूसह शरीराच्या अनेक भागांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. मासिक पाळीत रक्तस्त्राव स्त्रियांमध्ये देखील होऊ शकतो. याशिवाय प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो आणि यकृताचा आकार वाढतो. चुकीची औषधे घेतल्याने लिव्हरची समस्या वाढू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News