23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

तुमच्या मुलाचाही हाईटचा प्रॉब्लेम आहे? फॉलो करा या 5 टिप्स, टीनएजनंतरही वाढेल उंची


मुंबई, 27 सप्टेंबर : मुलाची उंची नीट वाढत नसेल तर प्रत्येक पालकांची चिंता वाढू लागते. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो, पण अनेकदा त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग कौटुंबिक जीन्सला दोषी ठरवलं जातं. परंतु, उंची न वाढण्यामागे केवळ जीन्सच जबाबदार नसून यामागे अनेक कारणे असू शकतात, असे विज्ञान सांगते. हवामान, सभोवतालचे वातावरण, मृदा आणि बहुतेक सर्व पौष्टिक घटकांची कमतरता उंचीवर परिणाम करतात. मुलांची उंची वाढवायची असेल, तर त्यांना योग्य ती पोषणद्रव्ये देणे आवश्यक आहे. जर तुम्हीही तुमच्या मुलांची उंची न वाढवण्याने त्रस्त असाल तर, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करा. मूल जरी वयाने मोठे झाले असेल तरी त्याची उंची नक्कीच वाढेल.

मुलांची उंची वाढवण्यासाठी टिप्स

संतुलित आहार –

TOI नुसार, जर मुलांना संतुलित आहार दिला तर पौगंडावस्थेनंतरही त्यांची उंची काही प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे मुलांच्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे इतर प्रकारचे जुनाट आजारही होणार नाहीत. अहवालानुसार, मुलांच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य (होलग्रेन) आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने मुलांची उंची वाढते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुलांची हाडे मजबूत करतात.

व्यायाम

-आजकाल मुले मैदानी खेळांकडे कमी लक्ष देतात. त्यामुळे मुलांना शक्यतो खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. जर मूल थोडे मोठे झाले आणि त्याची उंची वाढत नसेल तर प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतील. 15 वर्षांनंतरही व्यायामाने उंची वाढू शकते.

पॉश्चर नीट ठेवा –

कंबर आणि मान सतत वाकवलेल्या स्थितीत राहिल्यास 3 ते 4 इंच उंची अशीच कमी दिसते. जर तुमचा पॉश्चर नेहमी खराब असेल तर त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. यामुळे पाठ आणि मान दुखते. म्हणूनच पॉश्चर योग्य असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लॅपटॉपवर बराच वेळ काम करत असाल तर खुर्चीच्या मागे उशी ठेवा. कंबर आणि मान नेहमी सरळ ठेवा.

हे वाचा – जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश

चांगली झोप-

मुलांच्या उंचीसाठीही चांगली झोप खूप महत्त्वाची असते. पौगंडावस्थेतील झोपेच्या वेळी मानवी वाढीसाठी हार्मोन स्त्रवला जातो. हा हार्मोन उंचीसाठी जबाबदार असतो, परंतु हा हार्मोन फक्त झोपेच्या वेळी बाहेर पडतो. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहे. यासाठी पौगंडावस्थेत रात्रीचा स्क्रीन टाईम कमी करा आणि दिवसा शारीरिक कामाकडे अधिक लक्ष द्या.

5. सप्लिमेंट्स- जर तुम्ही योग्य आहार घेतलात तर सर्व प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात. परंतु, काही वेळा फक्त अन्न पुरेसे नसते. मुलांच्या उंचीसाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मुलांची उंची वाढत नसेल तर त्यांना व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स देऊ शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News