25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

नवरात्रीचा तिसरा दिवस कसा जाणार? 28 सप्टेंबर रोजीचं तुमचं राशिभविष्य


आज दिनांक 28 सप्टेंबर 2022. वार बुधवार. आज आश्विन शुक्ल तृतीया. तिसरी माळ. नानाविध फुलांनी आज मातेची चंद्रघंटा या दिव्य स्वरूपात पूजा करण्यात येते. सुवर्ण वर्ण, भाली अर्धचंद्र धारण केलेली माता सर्वांना दीर्घायू प्रदान करो हीच प्रार्थना. चंद्र आज तूळ राशीत असेल. तिथे तो केतूसोबत योग करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस आनंद निर्माण करणारा आहे. सप्तम चंद्र कुटुंबात काही शुभ घटना घडवेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम आहे.

वृषभ

आज जवळपासचे प्रवास संभवतात. काही महत्त्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. षष्ठ चंद्र शरीर कष्ट देईल. राशीतील मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम.

मिथुन

आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. व्यय मंगळ अचानक काही समस्या निर्माण करेल. गुरुबळ उत्तम आहे. पंचम चंद्र केतू शुभ आहे. दिवस उत्तम.

कर्क

आज दिवस मध्यम आहे. चंद्र केतू सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. मातापित्यांची काळजी घ्या. कलह टाळा. शनी प्रकृती जपा, असं सांगत आहे. नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस .

सिंह

चंद्र केतू अधिक काम, घरात जास्तीची जबाबदारी असे परिणाम देईल. भावंडं सुख लाभेल. शुक्र शुभ आहे. प्राप्ती होईल मात्र प्रकृती जपा. दिवस शुभ.

कन्या

मन शंकित राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सगळे ठिक होईल. चंद्र अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.

तूळ

खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस चांगला.

वृश्चिक

व्यय स्थानातील चंद्र केतू कष्टाचा अनुभव देईल. मात्र तुम्ही स्वयंपूर्ण राहाल. धार्मिक कामात रस घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. प्रवास, संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल.

धनु

आज दिवस आनंदात राहण्याचा आहे. लाभ स्थानातील चंद्र केतू मित्रमैत्रिणी भेट घडवेल. प्रवास योग येतील. मंगल शत्रू स्थानात आहे. काळजी घ्या. दिवस उत्तम जाईल.

मकर

राशीच्या दशम स्थानातील चंद्र व्यावसायिक बाबीत काही घडामोडी घडवेल. राशी स्थानातील शनी कष्टदायक परिणाम देईल. जोडीदारासोबत प्रवास योग येतील. दिवस बरा आहे.

कुंभ

गुरू महाराज शनीवर अंकुश ठेवतील. मातृपितृ भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. भाग्य साथ देइल. आर्थिक लाभ संभवतात. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम.

मीन

आज अष्टम चंद्रकेतू सर्वदृष्टया मध्यम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. प्रकृती जपा. दिवस आर्थिकदृष्ट्या ठिक आहे.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News