12.8 C
New York
Monday, March 4, 2024

नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स – News18 लोकमत


मुंबई, 26 सप्टेंबर :  आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून पुढचे नऊ दिवस गरबा आणि नवरात्रीची धूम असणार आहे. अनेक जण मनसोक्त गरबा खेळण्यासाठी नवरात्रीची वाट पाहत असतात. तुम्हीही नवरात्रीत गरबा खेळणार असाल तर प्रकृतीची आणि आहाराची काळजी घ्या. तुमच्या शरीराची आणि सौंदर्याची काळजी घेण्यासाठी नवरात्रीमध्ये कसा आहार घ्यायला हवा, हे जाणून घेऊया.

1. नवरात्रीमध्ये गरबा खेळल्यावर तुमच्या शरीराचा खूप व्यायाम होतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी स्टॅमिना वाढवण्याची गरज असते. त्यासाठी स्टॅमिना वाढवण्यास मदत करणारा आहार घ्या.

2. नवरात्रीच्या काळात तुम्ही 6-7 तासांची झोप होईल, याची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर सकाळी थोडी जास्त झोप घ्या किंवा दिवसा आराम करा. त्यामुळे शारीरिक थकवा दूर होईल.

3. झोपेतून उठल्यानंतर सकाळी कोमट पाण्यात 1-2 थेंब लिंबाचा रस आणि 1/4 चमचा मध टाकून प्या. अर्ध्या तासानंतर एक ग्लास दूध प्या. यामुळे शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्व मिळतील.

4. गरबा खेळताना खूप घाम येतो. अशा परिस्थितीत शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे रोज किमान 12 ते 15 ग्लास पाणी प्या. पण एकाचवेळी जास्त पाणी पिऊ नका.

5. जर तुम्ही दररोज गरबा खेळत असाल तर तुमच्या सामान्य आहारात 300-400 कॅलरीज जास्त घ्या. याशिवाय फायबरयुक्त पदार्थ भरपूर खा. त्यामुळे एनर्जी टिकून राहते आणि तुम्ही निरोगीही राहू शकाल.

6. सकाळी 10-11 वाजेच्या दरम्यान कॅलरी जास्त असलेली फळं खा. फळांचं सेवन केल्याने तुम्हाला पोषणही मिळेल आणि आवश्यक ऊर्जाही मिळेल. फळांमुळे तुमचं डाएटदेखील होईल.

7. दुपारी मिल्कशेक, ज्युस किंवा नारळपाणी यांपैकी कोणतंही एक पेय घ्या. हे शरीरातील पाणी आणि उर्जेची पातळी संतुलित राखण्यास मदत करेल आणि तुमची पचनक्रिया चांगली ठेवेल. यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.

8. दुपारच्या जेवणात 2 चपात्या, भात, मसूर, दही, भाज्या, मिठाई व पनीर यापैकी कोणत्याही एका डिशचा समावेश करा.

9. गरबा खेळायला जाण्यापूर्वी 2-3 तास आधी उकडलेले बटाटे, साबुदाणा खिचडी, भाजलेले काजू आणि फळे खा.

10. गरबा खेळताना दर अर्ध्या तासाने ग्लुकोजचं पाणी प्या, यामुळे अशक्तपणा येणार नाही.

11. गरबा करताना तळलेलं अन्न, जंक फूड आणि शक्य असल्यास बाजारातील अन्न खाऊ नका. कारण त्यातून तुम्हाला फक्त कॅलरीज मिळतील, ऊर्जा नाही.

याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधाचं सेवन आवर्जून करा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि पोषणही मिळेल आणि नवरात्रीच्या दिवसात तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News