12.8 C
New York
Monday, March 4, 2024

बायको आजारी म्हणून दिव्यांग लेकीला दिली अशी आई; मजूर बाबाचा आविष्कार पाहून भलेभले थक्क – News18 लोकमत


पणजी, 26 सप्टेंबर :  बिपीन कदम… गोव्यातील एक साधा मजूर… बायको आणि 16 वर्षांची मुलगी असं त्याचं कुटुंब. पण बायको आजारी आणि लेक दिव्यांग… बायकोला आजारपणामुळे आणि त्याला मजुरीमुळे दिव्यांग लेकीची काळजीही घेता येत नव्हती. तिला साधं भरवताही येत नव्हतं, त्यामुळे त्यांचं हृदय तुटत होतं. पण तिच्या काळजीने, चिंतेने बिपीन रडत बसला नाही. या मजूर बाबाने आपल्या दिव्यांग लेकीसाठी आविष्कार घडवला. त्याने तिच्यासाठी अशी आई दिली की पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

आई-वडील आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात, हेच बिपीननेही सिद्ध करून दाखवलं आहे. मजुरीचं काम, बायको आजारी, दिव्यांग लेकीची काळजी घेण्यासाठी पैसे देऊन कुणी माणूस ठेवणं शक्य नाही, या सर्वांचा विचार करत बिपीन रडत बसला नाही.  एक साधा मजूर फक्त तिच्या लेकीसाठीच नाही, तर तिच्यासारख्या कित्येक दिव्यांगासाठी सुपरहिरोच ठरला आहे. त्याने आपल्या दिव्यांग लेकीला आई अशी आई मिळवून दिली जी तिची सावत्र नाही आणि तिची काळजीही घेईल. किमान तिला मायने दोन घास भरवेल. तिचं नाव मां रोबोट.

हे वाचा – एवढ्याशा चिमुकल्याने शिक्षिकेलाच दिली इतकी खतरनाक धमकी की…; VIDEO पाहून नेटिझन्सही घाबरले

हो बिपीनने आपल्या लेकीसाठी रोबोट बनवला आहे, जो तिला किमान आईसारखं भरवेल. कोणतंही तांत्रिक ज्ञान नाही, कुणाचीही मदत घेतली नाही. बस्सं फक्त इंटरनेटवर सर्च केलं, अभ्यास केला, प्रयोग केला आणि त्याने मां रोबोटची कल्पना प्रत्यक्षात साकारली.

दिवसभर मजुरी आणि त्यानंतर उरलेला वेळ तो रोबोट कसा बनवयाचा हा शिकू लागला.  त्याने ऑनलाइन सॉफ्टवेअर बेसिक शिकून घेतलं. दिवसरात्र मेहनत केली. अखेर त्याला य़श मिळालं. त्याने असा रोबोट तयार केला जो त्याच्या मुलीने सांगितलेलं ऐकतो. मुलीचा आवाज ऐकून तो तिला जेवण भरवतो.

” isDesktop=”true” id=”765910″ >

कोणतंही तांत्रिक ज्ञान नसतान, कुणाचीही मदत न घेता ऑनलाइन पाहून एका मजूर बाबाने आपल्या लेकीसाठी मां रोबोट तयार केला. त्यामुळे त्याच्या या आविष्काराचं कौतुक केलं जातं आहे.

हे वाचा – आपल्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेल्या जयेशचं बदललं आयुष्य, Video Viral झाल्यानंतर अशी आहे परिस्थिती

गोवा स्टेट इनोव्हेशन काऊन्सिलनेही त्याच्या या आविष्काराला दाद दिली आहे. या मशीनवर पुढे काम करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे. आता असे वेगवेगळे रोबोट बनवण्याचा मानस बिपीनचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News