27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

रोज या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात अनेक फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर – News18 लोकमत


मुंबई, 28 सप्टेंबर : कॉफीचे शौकीन अनेकजण असतात. पण काही लोकांना दिवसभरात अनेकवेळा कॉफी पिण्याची सवय असते. काहींना कॉफीशिवाय कामाचं होत नाही. कारण काहीही असो. सर्वाना कॉफी आवडते हे खरं. 28 सप्टेंबर हा दिवस कॉफी डे म्हणून साजरा केला जातो. कॉफीचे चाहते असलेल्या लोकांसाठी हा दिवस म्हणजे अगदी कोणत्याही कारणाशिवाय कितीही कोफी पिणे आणि तिचा आनंद घेणे.

मात्र तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही कॉफीचे सेवन प्रमाणात म्हणजेच दिवसातून केवळ एक ते दोन कप कोफी प्यायलात तर तुम्हाला कॉफीचे अनेक आरोग्य फायदे होतात. जे लोक नियमित कॉफी पितात त्यांना माहित आहे की, कॉफी थकवा दूर करून तुम्हाला उत्साही आणि एनर्जाटिक बनवते. असेच कॉफीचे आणखी काही फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बियांचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, आजच करा आहारात समावेश

कॉफी प्यायल्याने होणारे फायदे

कॉफीमुळे स्नायूमधील वेदना कमी होतात

जर्नल ऑफ पेनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, अथेन्सच्या जॉर्जिया विद्यापीठातील किनेसियोलॉजी विभागाच्या अभ्यासात असे आढळले की, दोन कप कॉफी इतके प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने विक्षिप्त व्यायामामुळे होत असलेली स्नायू-दुखी कमी होऊ शकते.

कॉफीमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो

आर्काइव्ह्ज ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात हार्वर्डचे डॉ फ्रँक हू यांनी केलेले संशोधन सादर केले गेले आहे. ज्यात असा दावा केला आहे की, दररोज सहा किंवा अधिक कप कॉफीच्या सेवनाने मधुमेहाचा धोका 22% कमी होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रकार II मधुमेहाचा धोका दररोज कॉफीच्या प्रत्येक कप सेवनाने 9% कमी होतो, तर डेकॅफ कॉफी प्रति कप 6% ने धोका कमी करते.

कॉफी अल्झायमर रोगाचा धोका कमी करते

क्रेंबिल रिसर्च इन्स्टिट्यूटचा एक भाग असलेल्या क्रेंबिल ब्रेन इन्स्टिट्यूटने अलीकडील अभ्यासात असे सुचवले आहे की कॉफी प्यायल्याने अल्झायमर आणि पार्किन्सन्स या दोन्ही आजारांपासून बचाव होऊ शकतो. अभ्यासामध्ये फेनिलिंडन्सची उपस्थिती आढळून आली, जे कॉफी बीन्स भाजण्याच्या प्रक्रियेच्या परिणामी उद्भवते.

कॉफी आत्महत्येचा विचार आणि नैराश्य कमी करते

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या महिला 4 किंवा त्याहून अधिक कप कॉफी पितात त्यांना नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता 20% कमी असते. शिवाय, कॉफी पिणार्‍यांमध्ये आत्महत्येचा विचारही कमी झाला आहे.

तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा…

कॉफी मल्टिपल स्क्लेरोसिसचा धोका कमी करते

जर्नल ऑफ न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी आणि मानसोपचार मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज किमान 4 कप कॉफी मल्टिपल स्क्लेरोसिसच्या विकास आणि पुनरावृत्तीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. कॉफीमुळे मज्जासंस्थेची जळजळ होण्यास प्रतिबंध होतो. या जळजळीमुळे रोगाचा विकास होऊ शकतो, असे अभ्यासात म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News