12.8 C
New York
Monday, March 4, 2024

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव !

चंद्रपूर…. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सोलापन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच यशोगंगासभागृह तुकुम येथे पार पडला.

सदर सत्कार सोहळ्याला व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, सामाजिक कार्यकर्ते गोंडवाना विद्यापठाचे शिनेट सदस्य बेलखेडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजर अली, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पी एम सहानी व मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार किशोर भाऊ जोरगेवार व मान्यवरांनी राजेश सोलापन यांना शुभेच्छा व त्यांच्या कार्याचा गौरव करत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या व मान्यवरांनी उपस्थितांना व पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये व दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणाने उत्तीर्ण क क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष अनिल देठे, महासचिव पुरुषोत्तम चौधरी, सचिव विनोद पन्नासे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, विकी गुप्ता, प्रकाश हांडे, अभिजीत बटपल्लीवार, अशोक गुरुवाले, प्रभाकर आवारी यांनी अथक व मोलाचे परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे संचालन विनोद पन्नासे तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम चौधरी यांनी केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News