27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

राष्ट्रवादी व तुलसी नगर येथील रोडची दुर्दशा! महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर… चंद्रपूर येथील तुकुम प्रभाग क्रमांक एक अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रवादी व तुलसी नगर येथे संपूर्ण परिसरात पावसाळ्याच्या पाण्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय झाल्याचे दृश्य पहावयास इथे मिळत आहे. संपूर्ण रस्ते पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय व खोल खड्डे जागोजागी पडलेले असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर समस्येमुळे या वार्डातील नागरिक प्रचंड त्रास सहन करीत आहे. सदर रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांना जाण्या येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांची सदर रस्त्या न जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .असे चित्र या वार्डात आहे.
परंतु याकडे महानगरपालिका प्रशासनाचे व या वार्डातील माजी नगरसेवकाचे संपूर्णता दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रवादी नगर व तुलसी नगर येथील 25 वर्षापासून रहावशी असलेले रमेश मरस्कोल्हे, अरुण मडावी, संतोष करडे, राहुल काकडे यांच्या परिसरात तर रोड व नाल्यांची समस्या प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.
पाहिजे त्या प्रमाणात इथे रोड व नाल्या चे बांधकाम करण्यात आले नाही दिवसेंदिवस नागरिकांच्या समस्या व लोकसंख्या इथे वाढत असल्याकारणाने पाहिजे त्या प्रमाणात विकास कामाला गती नाही. कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकाऱ्यांनी सदर समस्या कडे लक्ष वेधून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News