3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

गोळीबारत भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नी ठार

चंद्रपूर (चंद्रपूर वार्ता वृत्): २३ जुलै
स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेजाऱ्या घरी आश्रयात गेलेल्या एका व्यक्तीवर केलेल्या गोळीबारात भाजयुमो पदाधिकाऱ्याच्या पत्नीला गोळी लागून ठार झाल्याची घटना आज रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास् राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डात घडली. तर आश्रयास गेलेला लल्ली शेरवील हा गोळीबारात जखमी झाला आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव पूर्वशा सचिन डोहे असे आहे. ती राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डातील रहिवासी होती.
जखमी लल्ली शेरवील आणि भाजयुमोचा पदाधिकारी सचिन डोहे शेजारी आहेत. आज रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लल्ली शेरवीलवर त्याच्या घरी एका मारेकऱ्याने गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शेरवील हा जिव वाचवित कसाबसा पळून शेजारी सचिन डोहे यांचे घरी आश्रयास गेला. पळून जात असताना मारेकऱ्याने त्याचेवर गोळीबार केला. गोळीबार होत असल्याने सचिन डोहे यांची पत्नी ही घराबाहेर आली. शेरवीलवर झाडलेली गोळी थेट सचिन डोह यांची पत्नी पूर्वशा डोहे हिच्या छातीवर लागली आणि ती जागीच ठार झाली. ती 27 वर्षाची आहे. यावेळी तिचा पती सचिन हा घरी नव्हता. त्यानंतर चालविलल्या गोळीबारात शेरवील हा जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर घटनेनंतर मारेकरी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मारेकरी का एकटाच असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना राजूरा शहरातील सोमनाथपूरा येथे घडली. घटनेची माहिती राजूरा पोलिसाना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत चोख पोलिस बंदोबस्त लावला. पसार झालेल्या आरोपीचा राजूरा पोलिस शेाध घेत आहेत. शेरवील याचा कोळसा तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. कोळसा तस्करीच्या व्यवहारातून शेरवील याला जिवेमारण्याचा प्रयत्न झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेरवील शेजाऱ्या घरी घुसल्याने डोहे यांच्या पत्नीवर गोळी झाडून ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News